ठाणे- सर्वात जुन्या जवाहर बाग स्मशानभूमीच्या छोट्या चिमण्यांमधून निघणारा धूर नागरिकांच्या घरात जात होता. या संदर्भातील बातमी ईटीव्ही भारतने दाखवल्यावर प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. 20 ऑगस्टला मोठ्या चिमणीचे काम पूर्ण होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी करून येत्या २० ऑगस्टपर्यंत १०० फुट उंचीच्या चिमणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मुख्य बाजारपेठेची पाहणी करून तिथे आवश्यक ती साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमीच्या मोठ्या चिमणीचे काम 20 ऑगस्टपर्यंत करणार
जवाहरबाग स्मशानभूमी येथे सद्यस्थितीत ४० फुटाची चिमणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आली आहे. तथापि या चिमणीतून येणारा धूर या परिसरातील घरांमध्ये पसरत होता. त्यामुळे चिमणीची उंची वाढवावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक तसेच नागरिकांकडून होत होती. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी केली.
जवाहरबाग स्मशानभूमी येथे सद्यस्थितीत ४० फुटाची चिमणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आली आहे. तथापि या चिमणीतून येणारा धूर तेथील परिसरातील घरांमध्ये पसरत होता. त्यामुळे चिमणीची उंची वाढवावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक तसेच नागरिकांकडून होत होती. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी केली. जवाहरबाग स्मशानभूमीमध्ये सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेली चिमणी बदलून त्याठिकाणी १०० फुट उंचीची चिमणी बसविण्यात येणार आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत २० ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच आयुक्तांनी मुख्य भाजीपाला मार्केटची पाहणी करून त्याठिकाणी कचरा होणार नाही आणि दिवसातून किमान दोन वेळा तरी कचरा उचलण्यात यावा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथील मैदानाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.