ठाणे - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत कोरोनाच्या काळात निर्बंधाचे (Fines To Transporters) उल्लंघन करून वाहनावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आणि वाहनावर फॅन्सी नंबरपेल्ट लावून फिरणाऱ्या वाहनांवर धडक कारवाईची विशेष मोहीम ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. (Corona Rules In Maharashtra) १ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ६४१ वाहनचालका (Fines To Transporters In Thane) विरुध्द चलान फाडण्यात आले. तसेच, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या निर्बंधांचे उल्लंघन करीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या १७८८ वाहनधारकांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
एकूण ६४१ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३ लाख ५४ हजार ५०० रुपयांची वसुली
ठाणे वाहतूक विभागाच्या पोलीस पथकांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत केलेल्या कारवाईत अधिक प्रवासी वाहून नेण्याप्रकरणी आणि फॅन्सी नंबरप्लेट प्रकरणी केलेल्या कारवाईत वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट लावल्या प्रकरणी केलेल्या कारवाईत ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४९ जणांवर दंडात्मक कारवाई करीत ३१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक वसुली केली. तर, कोपरी परिसरात ६ जणांवर कारवाई करीत ३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ जणांवर कारवाई १४ हजाराचा दंड, वागळे हद्दीत ५३ जणांवर कारवाई २७ हजार ५०० रुपयांचा दंड, कापूरबावडी परिसरात ५२ जणांवर कारवाई ३० हजार रुपयांचा दंड, कासारवडवली पोलीस ७९ जणांवर कारवाई ४२ हजार ५०० रुबाप्यांचा दंड, राबोडी परिसरात १८ जणांवर कारवाई करीत १० हजाराचा दंड वसुली, कळवा परिसरात २४ जणांवर कारवाई करीत १३ हजार ५०० रुपयांचा दंड, मुंब्रा परिसरात १२ जणांवर कारवाई आणि ७ हजार ५०० रुपयांचा दंड, भिवंडी परिसरात ४६ जणांवर कारवाई आणि २४ हजाराचा दंड वसुली, नारपोली-३५जणांवर कारवाई १७ हजार ५०० रुपयांचा दंड वसुली, कोनगाव-१० जणांवर कारवाई आणि ५ हजार ५०० रुपयांचा दंड, कल्याण ५९ जणांवर कारवाई आणि ३१ हजार ५०० रुपयांचा दंड, डोंबीवली-१८ जणांवर कारवाई आणि १२ हजाराचा दंड, कोळसेवाडी-५९ जणांवर कारवाई ३० हजार ५०० रुपयांचा दंड, विठ्ठलवाडी-३३ जणांवर कारवाई आणि १९ हजार ५०० रुपयांचा दंड, उल्हासनगर - २५ जणांवर कारवाई आणि १४ हजाराचा दंड, अंबरनाथ-३८ जणांवर कारवाई आणि २० हजार ५०० रुपयांचा दंड वसुलीची कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. वाहनांवर फॅन्सी नंबर लिहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ६४१ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३ लाख ५४ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे.