महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्राणी - पक्षी मृत्यू प्रकरणी त्या 3 दुकान मालकांवर गुन्हे दाखल करा, पॉज संस्थेची मागणी - पॉज संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे

आगीत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले शेकडो पक्षी, प्राणी, मासे जळून खाक झाल्याने प्राणी मित्र संघटना पॉजने विक्री करणाऱ्या त्या ३ दुकानदारांविरोधात प्राणी अत्याचार विविध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

paws organization on birds animal death thane
दुकान आग रामबाग परिसर

By

Published : Jan 12, 2022, 7:44 PM IST

ठाणे - कल्याण पश्चिम भागातील रामबाग परिसरात असलेल्या मेनरोडवरील तीन दुकानांना भीषण आग लागण्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली होती. या आगीत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले शेकडो पक्षी, प्राणी, मासे जळून खाक झाल्याने प्राणी मित्र संघटना पॉजने विक्री करणाऱ्या त्या ३ दुकानदारांविरोधात प्राणी अत्याचार विविध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

माहिती देताना पॉज संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे

हेही वाचा -Leopard in Ulhasnagar : मानवी वस्तीत बिबट्याची दहशत; वन विभागाची शोध मोहीम सुरु

पक्षी - प्राण्यांची पिजऱ्यांत बंद करून बेकायदा विक्री

कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात विविध पाळीव पक्षी, प्राणी व मासे विक्रीची दुकाने आहेत. मात्र, ही दुकाने केवळ शॉप परवाना असल्याचे दाखवून या ठिकाणी पक्षी व पाळीव प्राण्यांना पिजऱ्यांत बंद करून त्यांची बेकायदा विक्री होत असल्याचा आरोप प्राणीमित्र असलेल्या पॉज संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, भीषण आगीतूनही अग्निशमन दलाच्या जवानांनी बहुतांश पक्ष्यासह प्राण्यांचे प्राण वाचवले आहेत.

वन अधिकारी कार्यलयाच्या काही अंतरावर सुरू होती विक्री

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या दुकानांत कबतूर, पोपट, लव्हबर्ड आदी रंगीबेरंगी पक्षांसह ससे पिंजऱ्यात बंद करून विक्री केले जात होते. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण मात्र समजू शकले नाही. तर, आगीच्या घटनेची नोंद महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, प्राणीमित्र संघटना असलेल्या पॉज संस्थेने पक्षी - प्राणी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबधित तीन दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत लेखी तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे यांनी सांगितले.

हेही वाचा -Fines To Transporters In Thane : कोरोना नियमांचे वाहनधारकांकडून उल्लंघन; पोलिसांनी 11 लाखांचा दंड केला वसूल

ABOUT THE AUTHOR

...view details