ठाणे -युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे. ( Ukraine Russia War ) युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून बाहेर पडण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. हजारो विद्यार्थी किलोमीटरचा पायी प्रवास करत रोमानिया आणि पोलंड देशांच्या सीमेवर पोहोचत असून तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांना भारत सरकारकडून मदत केली जात आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला लव शर्मा ठाण्यातील युवकही त्यापैकीच एक आहे. लहू आता परतीच्या मार्गावर असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील तीन वर्षे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ठाण्यातील लव शर्मा हा युवक महत्त्वाची परीक्षा असल्याने 23 व 24 फेब्रुवारीला तिकिट असतानाही तो येऊ शकला नाही. युद्धाचा भडका उडाल्यानंतर पायी प्रवास करत लव शर्मा हा सीमेवर आला. पण, अतिशय थंड वातावरणात अन्न पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना प्रचंड हाल सोसावे लागले. पण, लव आता परतीच्या मार्गावर असल्याने त्याच्या आई वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.