महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Municipality administration : ठाण्यात स्वाईन फ्ल्यून वाढत असल्याने नागरिकांमध्ये धास्ती; महापालिका प्रशासनाने केली आरोग्य यंत्रणा सक्षम - Covid Center

वातावरणातील बदल आणि कोसळणारा पाऊस यांमुळे ठाण्यातील (Thane) तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. व्हायरल तापाचे प्रमाण सर्वाधिक असून, स्वाईन फ्ल्यू (Swine flu) च्या आजारामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. शहारत कोविड बरोबर आता स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले आहे. तर आतापर्यंत दोन जण दगावल्याने, नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यूची धास्ती वाढत आहे. यामुळे सतर्क झालेल्या ठाणे महापालिका (Thane Municipality) प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम (The municipal administration enabled the health system) केली आहे. तसेच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये (Covid Center) स्वाईन फ्ल्यू कक्ष सज्ज ठेवला असल्याची माहिती, पालिका प्रशासनाने दिली आहे.

Thane Swine Flu
ठाणे स्वाईन फ्ल्यू

By

Published : Jul 26, 2022, 7:41 PM IST

ठाणे :-वातावरणातील बदल आणि कोसळणारा पाऊस यांमुळे ठाण्यातील (Thane) तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. व्हायरल तापाचे प्रमाण सर्वाधिक असून, स्वाईन फ्ल्यू (Swine flu) च्या आजारामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. शहारत कोविड बरोबर आता स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले आहे. तर आतापर्यंत दोन जण दगावल्याने, नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यूची धास्ती वाढत आहे. यामुळे सतर्क झालेल्या ठाणे महापालिका (Thane Municipality) प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम (The municipal administration enabled the health system) केली आहे. तसेच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये (Covid Center) स्वाईन फ्ल्यू कक्ष सज्ज ठेवला असल्याची माहिती, पालिका प्रशासनाने दिली आहे. वाढत्या आजारावर प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन उपायोजना करण्यावर भर दिला आहे. शहरात स्वाईन फ्ल्यूचे २० रुग्ण आढळले आहेत. यात माजिवडा - मानपाडा प्रभागातील ९ रुग्ण आहेत. यामुळे पालिका प्रशासन सतर्क झालेअसून, संपर्कात असलेल्या ६०० हुन अधिक जणांच्या घरामध्ये सर्वेक्षण करून तपासणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रीया देतांना ईटिव्ही चे प्रतिनिधी


ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दररोज आढळत आहे. गेले काही दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे साथीच्या आजारांनीही डोके वर काढल्याचे दिसुन येत आहे. तेव्हा,शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत, यासाठी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत व्यापक प्रमाणात धूर व औषध फवारणी सुरु आहे. तसेच, स्वाईन फ्ल्यूची साथ रोखण्यासाठी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या घरी जावून प्रत्यक्षपणे तपासणी करण्यात येत आहे.



आतापर्यंत तपासणीत शहरात स्वाईन फ्ल्यूचे २० रुग्ण आढळले असुन, एक महिला व एका पुरुषाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यु झाला. स्वाईन फ्ल्यूच्या २० रुग्णांपैकी कोपरी प्रभागात ३ रुग्ण, कळवा २, माजिवडा- मानपाडा ९ रुग्ण उथळसर २,वर्तकनगर ४ स्वाईन फ्ल्यू चे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात कोसळलेल्या संततधारेमुळे जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे आजार बळावत आहेत. १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत मलेरियाचे १९४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर डेंग्युचे १४ रुग्ण आढळले आहेत. यातील डेंग्युच्या दोन रुग्णांचा मृत्यु ओढवल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.


नियमाचे पालन करून स्वाईन फ्ल्यूवर मात करा :स्वाईन फ्ल्यू ची लक्षणे आढळल्या नंतर कुणीही घाबरून जाऊ नये. तसेच ज्याप्रमाणे कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्री चे पालन करण्यात येते. त्याचप्रमाणे या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचे पालन करावे,असेही पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर, ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा मध्ये स्वाईन फ्ल्यू रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नियमाचे पालन करून स्वाईन फ्ल्यूवर मात करा, असे आवाहन करण्यात आले आहे.



संसर्ग वाढला डॉक्टरांपुढे आवाहन :काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे तापमानात झालेला बदल आणि शहरातील अस्वच्छता यांमुळे साथीचे आजार फोफावत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा आणि साथीचे आजार हे समीकरण जुने असले तरी, यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामध्ये व्हायरल तापासह स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच मलेरिया अशा साथीच्या आजारांचाही समावेश असल्याचे दिसून येते. कोणत्याही साथीच्या रोगात ताप हे प्राथमिक लक्षणे म्हणून ओळखले जात असल्याने, सध्या तापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले जात असले तरी, चाचण्यांनतर रोगाची निश्चिती होत असल्याच्या घटना वाढत आहेत. शहरातील अस्वच्छता, साचणाऱ्या पाण्यात डासांची होणारी पैदास यांमुळे गेल्या आठवड्यापासून तापाच्या लक्षणांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. अनेकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे दिसून येते. यासह स्वाइन फ्लूचा विळखाही दिवेसंदिवस घट्ट होत असून, व्हायरल तापाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. पावसात भिजताना न घेतली जाणारी काळजी ,किंवा रुग्णाच्या संपर्कात आल्याने होणारा संसर्ग, यांमुळे शहरात तापाची साथ अधिक वाढीस लागत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.


कशी घ्याल काळजी ? :
१.पाणी गाळून व १० मिनिटे उकळुन प्यावे.
२.पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन ( गोळया / द्रावण ) वापरावे.
३.आपल्या इमारतीमधील गच्चीवरील व जमिनीवरील टाकी तसेच घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून घ्याव्यात. तसेच त्या टाक्यांची झाकणे व Over Flow Pipe जाळीने अच्छादित करावेत.
४. हात स्वच्छ धुतल्याशिवाय काही खाऊ नये .
५. शिळे तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत.
६. उघड्यावर शौचास बसु नये.
७ आजार दुषित पाण्यामुळे होऊ नये, याकरीता साचलेल्या पाण्यातुन चालणे टाळावे. पायाला जखम असल्यास साठलेल्या पाण्यातून चालत जाऊ नये. साचलेल्या पाण्यातून चालताना अनवाणी न चालता गमबुटाचा वापर करावा. तसेच उंदरांमुळे लेप्टोपायरॉसिसचा अधिक प्रसार होतो याबाबत काळजी घ्यावी.
९. स्वतःच्या घरातील अथवा आजुबाजुच्या कोणत्याही व्यक्ती कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर ( टायफॉईड ) इ. साथीच्या रोगांनी आजारी असल्याचे समजल्यास, त्यांची माहिती त्वरित नजीकच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात अथवा आरोग्य विभाग, मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे.



हेही वाचा :Vitamin B6 : व्हिटॅमिन बी 6 चिंता कमी करण्यास करते मदत - संशोधनात स्पष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details