महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

१५ मृत बगळ्यापैकी ५ बगळ्यांचा मृत्यू बर्डफ्ल्यूने झाल्याचे स्प्ष्ट - बर्ड फ्ल्यू बद्दल बातमी

ठाण्यातील 15 मृत बगळ्यांपैकी 5 बगळ्यांचा मृत्यू बर्डफ्ल्यूने झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ठाणे महापालिकेने बर्ड फ्ल्यू नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

Out of 15 dead herons, 5 herons died due to bird flu
१५ मृत बगळ्यापैकी ५ बगळ्यांचा मृत्यू बर्डफ्ल्यूने झाल्याचे स्प्ष्ट

By

Published : Jan 11, 2021, 8:41 PM IST

Updated : Jan 11, 2021, 9:30 PM IST

ठाणे - कोरोनाचा धोका आद्यपही संपलेला नसतानाच नव्याने बर्डप्ल्यूचा धोका वाढलेला असल्याचे चित्र दिसत आहे. मात्रा, यामुळे ठाणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. संपर्काने कोरोनाची लागण होत आहे, तर आता दुसरीकडे पक्षांच्या माध्यमातूनही धोका निर्माण झाल्याने ठाणेकरांवर रोगराईचे टांगती तलवार लटकत आहे.

१५ मृत बगळ्यापैकी ५ बगळ्यांचा मृत्यू बर्डफ्ल्यूने झाल्याचे स्प्ष्ट

चार दिवसापूर्वी ठाणे पालिकेच्या हद्दीत खाडी किनाऱ्यावर तब्बल १५ बगळे आणि पानबगळे मृत पावले होते. अचानक ठाण्यात बगळे आणि पानबगळे यांचा मृत्यू झाल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी पुण्याच्या वैद्यकीय शाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शाळेच्या आवाहालानुसार पाच बगळे पॉझिटिव्ह आल्याचे समजते. दुसरीकडे याची दाखल पालिकेनेही घेतल्याचे चित्र समोर आले आहे. पालिका आयुक्त आणि महापौर यांनी ठाणेकरांना घाबरून न जाण्याचा दिलासा दिला आहे. बर्डप्ल्यूचा धोका परभणी, ठाणे, दापोली आणि बीड परिसरात वाढल्याचे चित्र आहे.

चिकनच्या व्यवसायावर संक्रांत -

बर्डप्ल्यूच्या धसक्याने पुन्हा एकदा नागरिक चिकनच्या सेवनापासून दूर पळू लागले आहेत. त्यामुळे चिकनच्या व्यावसायिकांवर संक्रात येण्याची चिन्हे आहेत. परभणीत ८०० कोंबड्या बर्डप्ल्यूने मेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने आता महाराष्ट्रात पोल्ट्रीफॉर्मच्या व्यवसायावरही परिणाम होणार असलयाचे चित्र दिसत आहे.

आज ठाण्यात मृत कावळा आढळला -

बर्डप्ल्यूची ठाण्यात वाढती दहशत आणि पालिका प्रशासनाने सुरु केलेला नियंत्रण कक्ष आणि सोमवारीच ठाण्याच्या हिरानंदानी या उच्चभू वस्तीत चेलसा सोसायटी हिरानंदानी येथे एक कावळा मृतावस्थेत पडलेला आढळला. यामुळे ठाण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे पालिकेच्या बर्डप्ल्यू नियंत्रण कक्षात पहिली मृत कावळ्याची नोंद झाली आहे.

Last Updated : Jan 11, 2021, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details