ठाणे -ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळ्यांकडून विविध युक्त्या लावून लोकांची बँकखाती रिकामी करण्याचे प्रकार वाढीस लागलेले आहेत. असा प्रकार फिर्यादी राजेश शेटे यांचासोबत घडला. त्यांना लाईटबील भरण्याची लिंक पाठवून २० रुपये त्वरित भरा अन्यथा तुमची वीज खंडित होईल, अशी बतावणी करण्यात आली. त्यांनी लिंक डाउनलोड करून शुल्लक रक्कम २० रुपये ऑनलाईन भरले आणि त्यांच्या बँक खात्यातून पैस कटले. त्यांच्या खात्यातून ४६ हजाराची रक्कम चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी वर्ताक नगर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा -भिवंडीतील फर्निचर गोदामाला भीषण आग, सुदैवाना जीवित हानी नाही
फिर्यादी राजेश शेटे हे व्यावसायिक असून वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करतात. शेटे यांच्या मोबाईलवर महावितरणचे बिल भरा, अन्यथा तुमचे विद्युत मीटर खंडित होईल असे मॅसेज आले होते. या मेसेजकडे शेटे यांनी दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीने मोबाईलवर फोन केला. शेटे यांना आरोपीने त्यांना पाठविलेली लिंक डाउनलोड करून त्याच्यावरून केवळ २० रुपये पाठवा असे सांगितले. २० रुपयांची शुल्लक रक्कम असल्याने आणि विद्युत मीटर खंडित होणार नाही. म्हणून शेटे यांनी लिंकवरून २० रुपये ऑनलाईन टाकले. काही क्षणातच त्यांच्या बँकखात्यातून ४६ हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली. या प्रकरणी राजेश शेटे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वर्तकनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.