ठाणे :ऑस्ट्रेलियातील एका कंपनीमध्ये नोकरी ( Australian company job ) भरतीच्या नावाने ऑनलाईन मुलाखती ( online interview for Australian company ) घेऊन उच्चशिक्षित तरुणाला लाखोंचा गंडा घातल्याची घटना ( Online interview fraud for australian company ) घडली आहे. याप्रकरणी तीन भामट्यांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात ( Manpada police station Thane ) फसवणुकीसह सायबर क्राईम कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल ( financial fraud on Australian Company job ) करण्यात आला आहे. हिमांशु कदम, डॅन विल्सन, थॉमस जॉर्ज असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्यांची नावे आहेत.
वरले पॅरिसन कंपनीचे नाव सांगून गंडा -डोंबिवलीतील खोणी गावाच्या हद्दीतील लेकसाईड, लेकशोअर ग्रीन या हायप्रोफाईल सोसायटीत उच्चशिक्षित शिबाशिष प्रशांत मुखर्जी (47) कुटूंबासह रहातात. काही महिन्यापूर्वी आरोपी हिमांशु कदम, थॉमस जॉर्ज, डॅन विल्सन यांनी ३१ मे २०२२ ते १४ जून २०२२ या कालावधीत आपण ऑस्ट्रेलियामधील वरले पॅरिसन या सल्लागार कंपनीतील प्रतिनिधी असून आम्ही तिघे या कंपीनीत नोकर भरती विषयक मुलाखती, नियुक्त्या विषयक कामे आ करतो असे भामट्यांनी शिबाशिष यांना मोबाईलवर संर्पक करून सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी या भामट्यांनी शिबाशिष यांना संर्पक करून ऑस्ट्रेलियातील ॲकॉम, ऑटॉन, एचसीसी कंपनीत साहाय्यक उपाध्यक्ष पदे रिक्त आहेत. या ठिकाणच्या भरती प्रक्रियेसाठी आम्ही मुलाखती इच्छुक, पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत. असे संभाषण करताच या भामट्यांच्या त्रिकुटावर विश्वास ठेऊन शिबाशिष यांनी ऑनलाईन मुलाखत दिली.