ठाणे -ठाण्यातील एका युवकाने आपल्या घरात हजारो गणेशमूर्तीचे संकलन करून अनोखा छंद जोपासला आहे. दिलीप वैती असे या अवलीयाचे नाव आहे. देश-विदेशातील हजारोच्या वर गणेश मूर्तींचा संग्रह वैती यांच्या घरात आहे. गेली 33 वर्षे त्यांचा हा शिरस्ता सुरु असून भविष्यात सृष्टी गणेशा या उपक्रमाद्वारे देववृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यातील गणेश भक्ताकडे एक हजार गणेश मूर्ती - One thousand Ganesha idols
ठाण्यातील दिलीप वैती यांच्याकडे 20 ग्रॅम वजनाच्या मूर्तीपासून ते ३०० किलोपर्यंत आणि अर्धा इंचापासून ते ४ फुटी गणेशमूर्तीचा संग्रह आहे. यासाठी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्यामध्ये हा संग्रह ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
एक हजार गणेशमूर्ती
20 ग्रॅम वजनाच्या मूर्तीपासून ते ३०० किलोपर्यंत आणि अर्धा इंचापासून ते ४ फुटी गणेशमूर्तीचा संग्रह त्यांच्या घरातच केला आहे. यासाठी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्यामध्ये हा संग्रह ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यात कृषीगणेशा ते विश्वविनायकाच्या मूर्त्यांचा समावेश आहे. यात लक्ष वेधून घेणारी स्त्रीरूपी गणेश मूर्ती मनमोहक रुपात आहे. याच बरोबरच अखंड लाकडापासून तयार केलेली एक गणेश मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागच्या बाजूस नरसिंहाची कलाकृती असून, दुर्मिळ आहे. माती, शाडू, लाकूड, सोने-चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, शंख-शिंपले, नारळाची करवंटी, फायबर, सिरॅमिकटेराकोटा, मार्बल, मशरूम, दगड, काच अशा अनेक गणेश मूर्ती आहेत.