ठाणे - पुढे हत्या झाली असल्याची भीती दाखवत बँकेच्या शाखा अधिकाऱ्याला बोलण्यात गुंतवून त्याच्यााकडील सोनसाखळी आणि दोन अंगठ्या घेऊन भामट्याने पळ काढला. एकून ९० हजार किमतीचे दागिने भामट्याने लंपास केल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे.
पुढे खून झाल्याची भामट्याने मारली थाप, बँक अधिकाऱ्याचा लुटला ऐवज - thane
विलास यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या असे एकूण 90 हजार किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारस्वत सहकारी बँकेच्या मुलूंड शाखेचे शाखा अधिकारी विलास भगवान पाटील (वय.58 रा.गणेशवाडी,काटेमानिवली,कल्याण) हे 16 जुलैला ठाणे येथे गोखले रोड नौपाडा येथे झोनल ऑफिसमध्ये मिटिंगसाठी आले होते. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ते मॅकडोनाल्ड येथून पायी चालत जात असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली. त्याने एका मुलीची हत्या झाली असून तपासणी सुरु असल्याची बतावणी करत विलास यांना घाबरवले.
त्यांना सोबत घेऊन बस स्थानकानजीकच्या ठाणे नगर नियंत्रण कक्ष येथे नेले. विलास यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या असे एकूण 90 हजार किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.