महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मीरा चोप्रानंतर 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनंही घेतली बेकायदेशीरपणे लस - सिने अभिनेत्री सौम्या टंडन

ठाणे महापालिकेच्या पार्किग प्लाझा या कोविड केंद्रात अभिनेत्री मीरा चोप्राला झालेल्या बेकायदेशीर लसीकरणानंतर महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या तपासावरून आत्तापर्यंत २१ जणांना अशाप्रकारे बनावट ओळखपत्र दिल्याचे समोर आले आहे

सेलिब्रेटी लसीकरण प्रकरण
सेलिब्रेटी लसीकरण प्रकरण

By

Published : Jun 4, 2021, 7:30 AM IST

Updated : Jun 4, 2021, 1:21 PM IST

ठाणे-ठाण्यातील सेलिब्रिटी लसीकरण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. अभिनेत्री मीरा चोप्राप्रमाणे तब्बल २१ जणांना येथील ठेकेदाराने बनावट ओळखपत्र दिल्याची बाब समोर आली असुन यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. बनावट ओळखपत्र वापरून सिने अभिनेत्री सौम्या टंडन हिने लस घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या सेलिब्रेटी लस प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार आत्तापर्यंत यातील १५ जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सेलिब्रेटी लसीकरण प्रकरण


ठाणे महापालिकेच्या पार्किग प्लाझा या कोविड केंद्रात अभिनेत्री मीरा चोप्राला झालेल्या बेकायदेशीर लसीकरणानंतर महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या तपासावरून आत्तापर्यंत २१ जणांना अशाप्रकारे बनावट ओळखपत्र दिल्याचे समोर आले आहे. त्यातील १५ जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असतानाही पालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात मीरा चोप्रा या अभिनेत्रीला फ्रंटलाईन वर्कर असल्याचे दाखवून लस देण्यात आली होती.

सेलिब्रेटी लसीकरण प्रकरण
ठेका दिलेल्या ठेकेदाराने दिले बनावट आयडीओम साई आरोग्य सेवा या संस्थेनेच हे बनावट ओळखपत्र तयार करून अशाप्रकारे लस दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीअंती या समितीने सादर केलेल्या अहवालात १९ जणांना सुपरवायझर, तर २ जणांना अटेंडंट असल्याचे बनावट ओळखपत्र देण्यात आल्याचे समोर आले आहे.15 हायप्रोफाईल युवक युवतीया अहवालात आतापर्यंत 21 बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले असून 15 युवक युवतींनी लस घेतल्याचे उघडकीस आले आहे. या मध्ये मीरा चोप्रा या अभिनेत्रीनेही लस घेतल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर आता आणखी एक सिने कलाकार सौम्या टंडन हिचा देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. यांच्या सोबत इतरही बड्या घरातील मुलांनीही लस घेतल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
Last Updated : Jun 4, 2021, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details