मीरा भाईंदर(ठाणे)-मीरा भाईंदर शहरात २४ तासात १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी १५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर उपचार घेत असताना ४ जणांचा मृत्यू झाला. सध्या ८१२ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मीरा भाईंदरमध्ये १७१ कोरोनाबाधित रुग्ण वाढले; १५० कोरोनामुक्त तर ४ जणांचा मृत्यू - mira bhayandar corona patient
मीरा भाईंदर शहरात ३६०९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गुरुवारी १७१ रुग्ण वाढले असून १५० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मीरा भाईंदर मध्ये २७ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत गेली. गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मीरारोड पूर्व भागात ५८ रुग्ण, भाईंदर पूर्व परिसरात ८०,भाईंदर पश्चिम भागात ३३ आशा एकूण १७१ जणांचा समावेश आहे. यामध्ये ११२ नवे रुग्ण तर ५९ रुग्ण हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे लागण झालेले आहेत.
आतापर्यंत मीरा भाईंदर शहरात एकूण ३६०९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.कोरोनावर आतापर्यंत २६४८ जणांनी मात केली आहे. १४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.