ठाणे -शहरातील घोडबंदर रोडवरील मोगरपाडा तलावात, दीपक राजाराम पवार (40 रा. सुनील भोईर चाळ, कासारवडवली-ठाणे) हे सोमवारी संध्याकाळी ४ वाजता पडले होते. सोमवारी रात्री उशीरापर्यंत अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन दल त्यांचा शोध घेत होते. मात्र, रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. अखेर मंगळवारी पुन्हा शोध मोहीम सुरु केल्यानंतर शोध पथकाला त्यांचा मृतदेह सापडला आहे.
घोडबंदर रोडजवळील मोगरपाडा तलावात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला... हेही वाचा...मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले 168.09 कोटी!
पवार यांचा मृतदेह बाहेर काढून तो कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत पवार हे पोहण्यासाठी तलावात गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी दिली आहे. सोमवारी संध्याकाळी दीपक पवार हे मोगरपाडा तलावात (घोडबंदर-ठाणे) येथे पडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल पथकासह घटनास्थळी पोहचले.
त्यांच्या शोधासाठी अपत्ती व्यवस्थापानाचे पथक आणि टीडीआरएफचे १५ जवान, अग्निशमन दलाचे १२ जवान, एक फायर टेंडर, एक रेस्क्यू वाहन आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात होती. मात्र, सोमवारी त्यांचा शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हा त्यांचा मृतदेह सापडला.