ठाणे : पावसाची सुरुवात झाली की, गणेशभक्तांना चाहूल लागते ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची ( Ganesha Devotees Yearn for Arrival of Bappa ) आणि वेळ येते ती गणेश मूर्तीकारांवर गणेशमूर्तीवर ( Ganesha idol ) शेवटचा हात फिरवण्याची ( last hand on the Ganesha Idol ). त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील बाजारात भाविकांसाठी बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या उपलब्ध झाल्या आहेत. फेटेवाल्या, विविध रंगांच्या विविध आकारांच्या मूर्त्या बाजारात भाविकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी भाविकांचे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे पर्यावरणपूरक लाल मातीचा गणपती.
लाल मातीच्या मूर्त्यांचा उपयोग विसर्जनानंतर : पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी यंदाच्या वर्षी लाल मातीपासून बनवलेल्या मूर्त्यांची मागणी भाविक करताना पाहायला मिळत आहेत. या लाल मातीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्त्या गणेश पूजनानंतर घरात पाण्याच्या पिंपात किंवा छोट्याशा भांड्यात विसर्जन भाविक करू शकतात. विसर्जन केल्यानंतर या बाप्पाची तयार झालेली शाडूची लाल माती ही झाडांमध्ये, कुंड्यांमध्ये वापरात येऊ शकते. त्यामुळे यंदा या मूर्त्यांना जास्त मागणी आलेली पाहायला मिळत आहे. यंदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे. मात्र, मागील 2 वर्षांचा कोरोनाचा काळ आणि भाविकांची आर्थिक टंचाई पाहता यंदाच्या वर्षी बाप्पाच्या मूर्त्यांचे भाव वाढवले नसून, मागील वर्षाच्या दरात यंदाच्या वर्षीदेखील मूर्त्या भाविकांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे मूर्ती विक्रेते सचिन मोरे यांनी सांगितले.