ठाणे - दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली येथे आलेला एका रुग्णाला ( first Omicron patient in Dombivali ) ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर सहा संशयित ( 6 Suspects of Omicron in Dombivali ) असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांत विदेशांतून कल्याण डोंबिवली आलेल्या प्रवाशांपैकी नायजेरियातील चार, रशियातील एक आणि नेपाळमधील एक प्रवासी असे सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्या सहा जणांना महापालिकेच्या विलगीकरणात ( corona isolation ward of Dombivali corporation ) ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्यलक्षणे आहेत. यापैकी एकही रुग्ण अति जोखमीच्या देशातील नसल्याची माहिती डॉक्टर प्रतिभा पान पाटील यांनी ( Doctor Pratibha Pan Patil on Omicron ) दिली आहे.
हेही वाचा-Husband Wife Divorce On Bath : पत्नी दिवसातून ६ वेळा करायची अंघोळ, पतीने घटस्फोटासाठी गाठले न्यायालय
दक्षिण आफ्रिकेतून ४ दिवसापूर्वी डोंबिवली येथे आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आज त्या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर सद्यस्थितीत ६ रुग्णांना कोणत्या विषाणूची लागण झाली आहे का? यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पान पाटील यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले. तर नवीन विषाणूसंदर्भात पालिका विभाग पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.