महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक! ओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या, आरोपी फरार - bhiwandi

एका ओला चालकाची कारमध्येच अज्ञात आरोपीकडून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील मुबंई-नाशिक महामार्गावरील माणकोणी नाका येथील पूलाखाली घडली आहे.

ओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या
ओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या

By

Published : Aug 2, 2021, 4:20 PM IST

ठाणे - एका ओला चालकाची कारमध्येच अज्ञात आरोपीकडून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील मुबंई-नाशिक महामार्गावरील माणकोणी नाका येथील पूलाखाली घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. प्रभाकर गंजी (वय,४३रा. कन्हेरी, भिवंडी ) असे हत्या झालेल्या ओला चालकाचे नाव आहे.

ओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या, आरोपी फरार

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने ओला कारवर चालक
मृतक प्रभाकर हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने कुटूंबाच्या उपजिवेकीसाठी ओला कारवर गेल्या एक ते दीड महिन्यापासून कार चालक म्हणून कार्यरत होता. त्यातच ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारापासून मृतक प्रभाकरची कार मुबंई-नाशिक मार्गावरील माणकोली नाक्यावरील पुलाखाली उभी होती. बराच वेळ झाला कारमध्ये चालक ड्रायव्हर सीटवरच जागचा हलला नसल्याने काही स्थानिक नागरिकांना त्याचा संशय आला. त्यामुळे पुलावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्याने पोलिसांनी कारजवळ जाऊन पहिले तर प्रभाकर मृत अवस्थेत दिसला. त्यांनतर स्थानिक नारपोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रभाकराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.

मारेकरी पकडल्यानंतर हत्येचे कारण येणार समोर
मृतकच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा अज्ञात मारेकऱ्याविरोधात दाखल केला. आता पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली असून मारेकरी पकडल्यानंतर प्रभाकरच्या हत्येचे कारण समोर येणार असल्याचे सांगण्यात आले. तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षिक (गुन्हे) राजेश वाघमारे करीत आहेत.

हेही वाचा -मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट' नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड

ABOUT THE AUTHOR

...view details