महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'विठ्ठल विठ्ठल'च्या जयघोषामध्ये ठाण्यात निघाली चिमुकल्यांची वारी

दिंडीमध्ये विठ्ठल रूक्मिणी, पहारेदार, टाळ-मृदूंग वाजवणारे तसेच तुळशी वृंदावन घेणारे, असा पेहराव केलेले विद्यार्थी पाहायला मिळाले.

By

Published : Jul 11, 2019, 9:42 PM IST

चिमुकल्यांची वारी

ठाणे -जय हरी विठ्ठल, तुकारामाच्या भजनामध्ये दंग असलेल्या बालवारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात दिंडी साजरी केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'ब्राह्मण शिक्षण मंडळ' संचलित ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने नऊवारी साडी या संकल्पनेवर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

चिमुकल्यांची वारी

विद्यार्थ्यांच्या दिंडीमध्ये विठ्ठल रूक्मिणी, पहारेदार, टाळ-मृदूंग वाजवणारे तसेच तुळशी वृंदावन घेणारे, असा पेहराव केलेले विद्यार्थी पाहायला मिळाले. दिंडीच्या सुरवातीला पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापीका रोहिणी दिवाण, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नम्रता वडे आणि सहशिक्षकांनी ज्ञानोबाच्या पालखीचे पूजन केले. त्यानंतर चिमुकल्या वारकऱयांनी 'माऊली माऊली' गाण्याच्या तालावर छान रिंगण तयार केले, टाळ-मृदुंगाच्या गजरामध्ये बालकांनी फुगडी, पावल्या खेळले. यावेळी मंडळाचे चिटणीस अॅड. केदार जोशी यांनी चिमुकल्यांच्या वारीत सहभागी होऊन आनंद घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details