महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नुपूर शर्मांना मुंब्रा पोलिसांचे समन्स, कडक कारवाई न झाल्यास इमाम कौन्सिलचा आंदोलनाचा इशारा - नुपूर शर्मा समन्स मुंब्रा पोलीस

नुपूर शर्मा यांच्याविरोधात धार्मिक भावना ( Imam Council on Nupur Sharma ) दुखावणारी टिप्पणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलिसांनी ( Nupur Sharma summoned by Mumbra Police ) ईमेलवर नुपूर शर्मा याना २२ जूनला मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे ( Imam Council agitation warning over nupur sharma statement ) समन्स बजावले.

Nupur Sharma summoned by Mumbra Police
इमाम कौन्सिल

By

Published : Jun 9, 2022, 11:43 AM IST

ठाणे -नुपूर शर्मा यांच्याविरोधात धार्मिक भावना ( Imam Council on Nupur Sharma ) दुखावणारी टिप्पणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलिसांनी ( Nupur Sharma summoned by Mumbra Police ) ईमेलवर नुपूर शर्मा याना २२ जूनला मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे ( Imam Council agitation warning over nupur sharma statement ) समन्स बजावले. मात्र, कडक कारवाईचे चिन्हे दिसत नसल्याने मुंब्रा परिसरातील ऑल इंडिया इमाम कौन्सिलतर्फे कठोर कारवाई न झाल्यास लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे प्रदर्शन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

माहिती देताना ऑल इंडिया इमाम कौन्सिलचे अध्यक्ष

हेही वाचा -Malshej Ghat Bus Conductor Suicide : माळशेज घाट दरीत उडी मारून एसटी वाहकची आत्महत्या, कारण अस्पष्ट

मुस्लीम धर्मीयांचे दैवत असलेले प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्यावर अशोभनीय टिप्पणी भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत केली होती. मुंब्रा परिसरातील ऑल इंडिया इमाम कौन्सिलतर्फे मुंब्रा पोलीस ठाण्यात भाजप नेत्या शर्मा यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणारी टिप्पणी केल्या प्रकरणी मोहम्मद गुफरान अकमल खान यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने शर्मांच्या अटकेसाठी आंदोलन केले.

मुंब्रा पोलिसांनी पाठवली नोटीस -मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्मा याना ईमेलवर २२ जूनला मुंब्रा पोलीस ठाण्यात हजार राहण्याचे समन्स बजावले. बुधवारी ऑल इंडिया इमाम कौन्सिलने पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्यावर कडक कारवाई न झाल्यास लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आणि धरणे निदर्शने करणार असल्याचा इशारा दिला.

हेही वाचा -Ketaki Chitale : केतकी चितळेच्या जामिनावर 16 जूनला निर्णय; केतकीवरील हल्ल्यात गुन्हा नोंद करून दिला नसल्याचा वकिलांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details