महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महापालिकेचे लाजिरवाणे कृत्य; रुग्णांचे मृतदेह कचऱ्याच्या पिशवीतून पाठविले स्मशानात - Thane corona update news

सध्या कोव्हिड सेंटर्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतानाच मृतदेह लपेटण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या संपल्या आहेत. त्यामुळ चक्क कचऱ्याच्या काळ्या पिशव्या वापरण्यात येत असल्याचा निंदनीय प्रकार आज जवाहरबाग स्मशानभूमीत पहायला मिळाला.

Thane corporation hospital
ठाणे महापालिका रुग्णालय

By

Published : Apr 12, 2021, 10:44 PM IST

Updated : Apr 12, 2021, 11:04 PM IST

ठाणे-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे महानगरपालिकेचे सर्व दावे सपशेल ठरल्याचे समोर आले आहे. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नेण्यासाठी कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येत असल्याचे पाहून नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातल्याने दररोज अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. सध्या कोव्हिड सेंटर्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतानाच मृतदेह लपेटण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या संपल्या आहेत. त्यामुळ चक्क कचऱ्याच्या काळ्या पिशव्या वापरण्यात येत असल्याचा निंदनीय प्रकार आज जवाहरबाग स्मशानभूमीत पहायला मिळाला. कोव्हिड सेंटर्सबाहेर शववाहिन्या तासनतास उभ्या राहत असून पिशव्याअभावी मृतदेह सोपाविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत प्रचंड गर्दी होत आहे. कोट्यवधींचे वार्षिक बजेट असलेल्या ठाणे महापालिकेसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. महापौर आणि पालकमंत्र्यांनी इकडे लवकरात लवकर लक्ष द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी केली आहे.

मृतदेह पॅकिंगसाठी पिशव्यांची कमतरता नाही


हेही वाचा-उत्सव, टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता देशाला लस द्या; राहुल गांधींचा हल्लाबोल

मृतदेह उचलणाऱ्यांना पीपीई कीट नाही

ठाण्यात ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक नाही. रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा असून बेड नाहीत. अशा बिकट परिस्थितीत ठाणेकर नातेवाईक रुग्णांसाठी धावपळ करीत आहेत. ठाणेकरांना मृत्यूनंतरही अंत्यसंस्काराच्या साहित्यांचा अभावाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे जीव धोक्यात टाकून वाहनातून मृतदेह आणल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी असलेले कर्मचारी यांना जीवनरक्षक पीपीई कीट नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लॉकडाऊबाबत निर्णय घेणार - एकनाथ शिंदे

बॉडी बॅग्स प्रकरणाची करणार चौकशी - पालिका अतिरिक्त आयुक्त-

ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की, प्रत्यक्षात कोरोनाचे मृत्यू आणि करोना मृत्यूचा पालिकेचा आकडा या आकडेवारीमध्ये तफावत असू शकते. कदाचित ठाणे बाहेरील म्हणजेच जिल्हातील काही मृतदेह या स्मशानभूमीत आणले असावे . तरीही या सर्व गोष्टींचे निरीक्षण केले जाईल व आढावा घेतला जाईल. तर कोणत्याही कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला पीपीई किट घातल्याशिवाय हात लावू नये. तर मृतदेह पॅकिंगसाठी पिशव्यांची कमतरता नाही. तरी या सर्व प्रकाराची चौकशी करू, असे ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त देशमुख यांनी सांगितले आहे.

51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ-

राज्यात मागील 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचला आहे. तर 58 हजार 245 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 52 हजार 312 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 28 लाख 34 हजार 473 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

Last Updated : Apr 12, 2021, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details