नवी मुंबई (ठाणे) - मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चांदीवाल आयोगात भेट झाली होती. या भेटीबाबत चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. असे असले तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी म्हटले आहे.
चांदीवाल आयोग सुनावणीसाठी अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचीदेखील ( Sachin Waze meet Param bir singh ) नियमित तारीख होती. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे चांदीवाल आयोगाच्या समोर जाण्याआधी समन्स रुममध्ये त्यांची सचिन वाझेसोबत भेट झाली. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा-Param Bir Singh's Warrant Cancelled : परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द
भेटी दरम्यान नवी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक होते गार्ड इंचार्ज-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यात भेट घडून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये चर्चा झाल्याचीदेखील माहितीही समोर आली आहे. नवी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे गार्ड इंचार्ज होते. त्यांच्या ताफ्यातील गार्डही समन्स रुमबाहेर तैनात होता. या भेटी संदर्भात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांना पत्रकार परिषदेत ( Mumbai Police commissioner Bipin Kumar Singh ) विचारणा केली. तेव्हा त्यांनी या भेटी संदर्भात आमच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे म्हटले आहे. ही माहिती मला माध्यमातून मिळाली असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा-Chandiwal Commission : अनिल देशमुख, परमवीर सिंग, सचिन वाझेंची एकत्रित चौकशी होणार