महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण-डोंबिवलीत 24 तासात कोरोनाचे नवे 62 रुग्ण; तर आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू - Kalyan Dombivali Coronavirus updates

कल्याण डोंबिवलीत आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 4 अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच आजच्या रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेकडील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे.

Kalyan Dombivali Municipal Corporation
कल्याण डोंबिवली महापालिका

By

Published : Jun 3, 2020, 10:31 PM IST

ठाणे -कल्याण-डोंबिवलीत 24 तासात 62 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर आजच्या रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेकडील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे.

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पाहता 3 दिवसापूर्वीच महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 1 हजारांचा टप्पा पार केला आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 4 अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दुसरीकडे 580 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या स्थितीत 614 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details