ठाणे -नाशिक महामार्गालगत असलेल्या रुस्तमजी गृहसंकुलात राहणाऱ्या त्रिपाठी कुटुंब नेपाळला पर्यटनासाठी गेले. मात्र, त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्रिपाठी कुटुंब ज्या कुटुंबात होते. ते विमान कोसळले. अन् ठाण्यातील त्रिपाठी कुटुंब मृत्युमुखी ( Thane Tripathi Family Death In Nepal Plane Crash ) पडले. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयासमोरील ओशो महावीर इमारतीत राहणाऱ्या सुरेश पुनमीया यांच्या कुटुंबातील चारजण आणि एक अन्य अशा पाच जणांचा सिक्कीम येथील कार अपघातात मृत्यू झाले. आज त्यांचे मृतदेह ठाण्यात आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. तर नेपाळ विमान दुर्घटनेत मृत पावलेले त्रिपाठी कुटुंबाचे मृतदेहच ओळखता येत नसल्याने अद्याप मृतदेह ठाण्यात आणण्यात आलेले नाहीत, अशी माहिती उपलब्ध आहे.
ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उच्चभू असलेल्या रुस्तमजी गृहसंकुलात अशोक त्रिपाठी राहत होते. तर अशोक त्रिपाठी आणि पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी हे विभक्त कुटुंब आहे. घटस्फोटामुळे न्यायालयाच्या निर्देशामुळे वर्षातून दहा दिवस अशोक त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर-त्रिपाठी हे दोन मुलांना घेऊन पर्यटनाला गेले होते. पती-पत्नी आणि २२ वर्षीय धनुष्य आणि १५ वर्षीय ऋतिका याना घेऊन नेपाळला दहा दिवसांच्या पर्यटनासाठी गेले होते. भक्तीधाम येथे जाण्यासाठी विमान पकडून निघालेल्या अशोक त्रिपाठी, पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी, मुलगा धनुष्य आणि मुलगी ऋतिक, असे चार जणांना काळाने असमानातच गाठले. त्यावेळी विमानात २२ प्रवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, विमान कोसळले आणि सर्व प्रवासी हे मृत्युमुखी पडले. मात्र, विमान कोसळल्याने मृतदेहाची पालक पटणे मुश्किल झाल्याची माहिती उजेडात आहे. पण, शेवटी त्रिपाठी कुटुंबावर नेपाळमध्येच काळाने घाला घातला. दहा दिवस विभक्त पति-पत्नी आणि मुले एकत्रित राहण्यासाठी गेले. मात्र, नियतीने त्यांना कायमचेच विभक्त केले. पर्यटनाला गेलेल्या ९ ठाणेकरांवर काळाने घाला घातल्याने ठाण्यात शोककळा पसरली आहे.