महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांना ईडीकडून झालेल्या अटकेचे पडसाद बुधवारी कल्याणातही पाहायला मिळाले. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP Protest in Kalyan) बुधवारी संध्याकाळी जोरदार निदर्शने करण्यात आली.

ncp protest
कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

By

Published : Feb 23, 2022, 9:38 PM IST

Updated : Feb 23, 2022, 9:47 PM IST

ठाणे -राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांना ईडीकडून झालेल्या अटकेचे पडसाद बुधवारी कल्याणातही पाहायला मिळाले. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP Protest in Kalyan) बुधवारी संध्याकाळी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

मुंबई-ठाणे पाठोपाठ कल्याणातही उमटले पडसाद -

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी झाली. नवाब मलिक सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. त्यानंतर 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. तर अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले नवाब मलिक हे दुसरे मंत्री आहेत. त्याचे पडसाद मुंबई-ठाणे पाठोपाठ कल्याणातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत अटकेचा निषेध केला.

भाजपकडून नाहक बदनामी सुरू-

यावेळी नवाब मलिक यांना पाठींबा दर्शवणारे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि ईडीवर टीका करणारे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून झळकवण्यात आले. भाजपाकडून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांची भाजपकडून नाहक बदनामी सुरू असल्याची प्रतिक्रिया महेश तपासे यांनी व्यक्त केली. तसेच अशा कारवायांमुळे सरकारवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसून महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Last Updated : Feb 23, 2022, 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details