महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Honored by President Draupadi Murmu : स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईने देशात पटकाविला तिसरा क्रमांक - Navi Mumbai Third Cleanest City in Country

नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर ( Navi Mumbai City Awarded as Third Cleanest City ) आहे. नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियम येथे आयोजित 'स्वच्छ अमृत महोत्सव' भव्य समारंभात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माजी ( Navi MMC Received Award of Clean City From Murmu ) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्वीकारला. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीप पुरी व राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय सचिव मनीष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Honored by President Draupadi Murmu
नवी मुंबई देशातील तृतीय क्रमांकांचे स्वच्छ शहर

By

Published : Oct 2, 2022, 11:24 AM IST

नवी मुंबई :“स्वच्छ भारत मिशन”अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये नवी मुंबई शहरास देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर ( Navi Mumbai City Awarded as Third Cleanest City ) आहे. नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियम येथे आयोजित 'स्वच्छ अमृत महोत्सव' भव्य समारंभात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्वीकारला. ( Navi MMC Received Award of Clean City From Murmu ) याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीप पुरी व राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय सचिव मनीष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.


कचरामुक्त शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस 'फाईव्ह स्टार मानांकन :या समारंभात 'कचरामुक्त शहरांमध्ये' नवी मुंबई महानगरपालिकेस 'फाईव्ह स्टार मानांकन' प्राप्त झाले असून, हे मानांकन मिळवणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. त्याचप्रमाणे ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहरास 'वॉटर प्लस' हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. या 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये देशभरातील 4360 शहरे सहभागी झाली होती. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पटकाविला.


ओडीएफ 'वॉटरप्लस' हे सर्वोच्च मानांकन मिळविणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर :'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील 'फाईव्ह स्टार मानांकन' प्राप्त एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) 'वॉटरप्लस' हे सर्वोच्च मानांकन मिळविणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी सक्रीय सहभाग घेत केलेल्या स्वच्छता कार्याचे फलित म्हणजे हे राष्ट्रीय सन्मान असल्याचे मत पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त करीत हे पुरस्कार स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना समर्पित केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details