महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवी मुंबई शहराला आज पाणी नाही, उद्याही कमी दाबाने होणार पुरवठा - navi mumbai water supply news

पंचवीस वर्षांपूर्वी नवी मुंबईकरांच्या सोयीसाठी मोरबे धरण उभारण्यात आले होते, त्यामुळे शहरात सर्वांना पाणीपुरवठा मुबलक होत आहे व प्रत्येकाच्याच सोयीचे असे हे धरण ठरत आहे.

पाणी, नळ

By

Published : May 25, 2021, 3:58 PM IST

Updated : May 25, 2021, 10:36 PM IST

नवी मुंबई -शहराला दररोज साडेचार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची डागडुजी तसेच पावसाळ्यापूर्वी होणारी कामे पाहता २५ मे रोजी ‘शटर डाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला आज पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

डागडुजी करण्यासाठी पाणीपुरवठा खंडित
मोरबे धरणाच्या डागडुजी बरोबरच शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांची देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे लवकरच मोरबे धरण भरण्याची शक्यता असल्याचे वर्तवल्यामुळे पाण्याचा विसर्ग लवकरच करण्याची गरज भासणार आहे. पंचवीस वर्षांपूर्वी नवी मुंबईकरांच्या सोयीसाठी मोरबे धरण उभारण्यात आले होते, त्यामुळे शहरात सर्वांना पाणीपुरवठा मुबलक होत आहे व प्रत्येकाच्याच सोयीचे असे हे धरण ठरत आहे. मोरबे धरणामुळे नवी मुंबई शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
उद्याही होणार कमी दाबाने पाणीपुरवठा:
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व मोरबे धरण येथे विद्युतपुरवठा खंडित करून तब्बल 72 कामे केली जाणार आहेत. धरणाच्या दरवाज्याची डागडुजी, रंगरंगोटी प्रवेशद्वाराची दुरुस्ती अशी कामे केली जाणार आहेत. मंगळवारी एकाच दिवशी ही कामे उरकली जाणार आहेत.
नवी मुंबईतील नागरिकांना पाणी पुरवठा खंडित करण्याची पूर्वकल्पना:
नवी मुंबईतील नागरिकांना मंगळवारी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना दिल्याने सर्वांनी पाण्याचा साठा करून ठेवला आहे. बुधवारीदेखील नवी मुंबई शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Last Updated : May 25, 2021, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details