नवी मुंबई - परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णांच्या संख्येने हजारचा टप्पा गाठला आहे. संक्रमण झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत लोकांमुळे नवी मुंबईत संक्रमण वाढले आहे . त्यामुळे 11 मे ते 17 मे या कालावधीत एपीएमसी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नवी मुंबई एपीएमसी मार्केट सोमवारपासून होणार सुरू - एपीएमसी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद
नवी मुंबई परिसरात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये एपीएमसी मार्केटमधून लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक होती. खबरदारीचा उपाय म्हणून एपीएमसी मार्केट एक आठवडा बंद ठेवण्यात आले होते. हे मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरू केले जाणार आहे.
सोमवारपासून एपीएमसी मार्केट टप्प्या-टप्प्याने उघडण्याचा निर्णय एपीएमसी बाजार समितीने घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत व्यापारी, माथाडी, मापाडी, कार्यालयीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ग्राहक, दलाल व त्यांचे निकटवर्तीय यांना कोरोनाची बाधा झाली आहे. एपीएमसी मार्केटमधून कोरोना संक्रमण झालेल्यांची संख्या 330 पेक्षा अधिक झाली आहे, याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येत नाही, तोपर्यंत बाजार समिती परिसर बंद ठेवण्याची मागणी समाजातील काही घटकांनी केली होती. मात्र एपीएमसी मार्केट ही अत्यावश्यक सेवा असून जास्त काळ मार्केट बंद ठेवणे शक्य नसल्याने, सोमवारपासून बाजार सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती सचिवांनी दिली आहे. मात्र, हे मार्केट टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. सोमवारी 18 मे पासून भाजीपाला अन्नधान्य व मसाला मार्केट सुरू करण्यात येणार असून फळे व कांदा, बटाटा मार्केट हे गुरुवार 21 मे पासून सुरू होणार आहे.