नवी मुंबई- अखिल भारतीय किसान सभा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या माध्यमातून विमानतळ भागातील बाधित नागरिकांनी सिडको भवनाच्या समोर मुक्काम मोर्चा काढला आहे. मागण्या पूर्ण न होईपर्यंत या ठिकाणी ठिय्या देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. सिडकोच्या माध्यमातून न्याय मिळत नाही; तोपर्यंत हा मोर्चा सुरुच राहील, असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
शून्य पात्रता व अपात्र पध्दत बंद करून सरसट सर्वांना पुनर्वसन पॅकेज लागू करावे, ही महत्त्वाची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. तसेच संबंधित मागण्या पूर्ण न होईपर्यंत सिडकोने बांधकामे न तोडण्याचे आवाहन त्यांनी केले.
कालपासून(दि.24डिसें) या प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम सिडको भवनासमोर असून त्यांनी याच ठिकाणी संसार मांडला आहे.
अनेक महिला या ठिकाणी चुली पेटवून स्वयंपाक करत आहेत. सर्व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत याच ठिकाणी मुक्काम मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हीच स्थिती कायम राहील असाही ईशारा प्रकल्पग्रस्तांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या