ठाणे:सध्या राजकीय वर्तुळामध्ये अंधेरी पोट निवडणुकीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून स्वर्गीय आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या Bharatiya Janata Party वतीने मुर्जी पटेल यांना देखील उमेदवारी देण्यात आली. मात्र विरोधकांनी भारतीय जनता पार्टी वरती सडकून टीका केली.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक क्षेत्रातून मागणी झाली. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पार्टी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचा स्पष्ट केले आहे. त्यानंतर अनेक राजकीय व्यक्तींकडून या निर्णयाचा स्वागत करण्यात आले आहे.