ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री ( eknath shinde security issue ) असताना त्यांच्या जीवाला धोका होता. तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना सुरक्षा नाकारली, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला होता. त्यानंतर आता ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनीही उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंना 'एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत हलगर्जीपण कर', असा फोन उद्धव ठाकरेंनी केला होता, असा आरोप नरेश मस्केंनी केला ( naresh maske allegation uddhav thackeray ) आहे.
'एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देण्याबाबत विनंती...' - एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत जो विषय पुढे आला, या विषयावर आता ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना जाब विचारला आहे. नरेश म्हस्के म्हणाले की, सात मे रोजी स्वत: वर्षांवर जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होते. एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची विनंती केली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेबाबत कोणतेही धोरण राबवलं नाही, अशी टीकाही नरेश मस्केंनी केली आहे.
'...तर आम्हाला नाईलाजास्तव बोलवं लागेल' - आदित्य ठाकरेंच जेवढ वय तेवढी वर्ष, तेवढी वर्ष आम्ही शिवसेनेसाठी मेहनत केलेली आहे. पाठीत खंजीर खुपसला अशा पद्धतीने आम्हाला बोललं नाही पाहिजे. माझी आदित्य ठाकरेंना विनंती आहे, जर अशा पद्धतीने आमच्याबद्दल ठाण्यात येऊन आरोप करायला लागले. तर, आम्हाला सुद्धा नाईलास्तव बोलावं लागले, असा इशार मस्केंना आदित्य ठाकरेंना दिला आहे.