ठाणे - एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेची अंगावरील दागिने लंपास करण्यासाठी तिच्या डोक्यात नारळ मारून ( hitting a coconut on elderly woman head ) खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना मुरबाड शहरातील म्हसा रोडवरील जंगलात घडली ( Murder of an elderly woman in Thane ) आहे. विशेष म्हणजे खून करून मारेकऱ्याने कोणताही सुगावा सोडला नव्हता. तरीही ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने आरोपीचा शोध घेत त्याला अटक करण्यात यश आले आहे. विकास बारकू जाधव (वय ३२, रा. देवगाव मुरबाड ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर निराबाई बाळाराम पाटील (वय ७८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरु -मृतक महिला मुरबाडमधील गणेशनगर परिसरात कुटूंबासह राहत होती. २३ मार्च रोजी मंदिरात जाते म्हणून घरी सांगून गेली होती. मात्र बराच वेळ झाला घरी परत आलीच नव्हती. त्यामुळे घरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार २४ मार्च रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यातच २६ मार्च रोजी निराबाई यांचा मृतदेह मुरबाड शहरातील म्हसा रोड वरील जंगलात आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरबाडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासात मृतदेहाच्या अंगावरील दागिने नसल्याचे दिसून आले.