मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहरातील कोरोना प्रार्दुभाव कमी झाला आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी मीरा भाईंदर शहरात दोन इमारती मध्ये १८ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. पालिका प्रशासनाकडून शहरातील या दोन इमारती सील करण्यात आल्या आहेत.
भाईंदर व मीरा रोड मधील दोन इमारती सील
शहरातील कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे अनेक कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. २४ तासात १८ रुग्ण दोन इमारतीमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. भाईंदर पश्चिमेकडील बृजभूमी कॉम्प्लेक्सच्या गिरीराज इमारतीमध्ये सहा रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर मीरा रोड परिसरातील लक्ष्मी पार्कमधील रश्मी पॅरडाईजमध्ये एकूण बारा रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यात चार लहान मुलांचा समावेश आहे.याच इमारतीमध्ये रविवारी एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे.
मीरा भाईंदर पालिकेने शहरातील दोन इमारती केल्या सील - दोन इमारती केल्या सील
भाईंदर पश्चिमेकडील बृजभूमी कॉम्प्लेक्सच्या गिरीराज इमारतीमध्ये सहा रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर मीरा रोड परिसरातील लक्ष्मी पार्कमधील रश्मी पॅरडाईजमध्ये एकूण बारा रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यात चार लहान मुलांचा समावेश आहे.याच इमारतीमध्ये रविवारी एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे.
शहरात आजपर्यंत १६१ रुग्ण कोरोना रुग्ण
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातच शहरात १६१ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रविवारी १४ रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यापैकी ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आतापर्यंत सरकारी व खाजगी रुग्णालयात एकूण ४९९३८३ जणांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील लोकसंख्या पाहता लसीकरणाला गती देणे गरजेचे आहे.
आयुक्तांचे शहरवासीयांना आवाहन
मीरा भाईंदर शहरातून कोरोना हद्दपार झाला नसून नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे पालन केले पाहिजे. सामजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.
हेही वाचा -अनिल परब यांनी ईडीकडे मागितला 14 दिवसांचा वेळ