ठाणे -आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्याच नंदेच्या घरात ११ लाखाची चोरी (Robbery) करणाऱ्या आणि नंदेसोबत मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) तक्रार करण्यास जाणाऱ्या भावजयीचा डाव उघड झाला. तक्रारदाराची भावजयीसह अन्य तिच्या सहकाऱ्यांना अवघ्या १२ तासात मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरीचा मुद्देमाला पोलिसांनी हस्तगत केला आहे.
Thane Crime : घरफोडी प्रकरणातील तक्रारदाराच्या भावजयीसह आरोपींना अटक; 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत - भावजयीने केली नंदेच्या घरात चोरी
सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्याच नंदेच्या घरात ११ लाखाची चोरी (Robbery) करणाऱ्या आणि नंदेसोबत मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) तक्रार करण्यास जाणाऱ्या भावजयीचा डाव उघड झाला.
मुंब्रा अमृतनगर भागातील शादी महल रोड परिसरात राहणाऱ्या चिस्तीय नगर, सी विंग इमारतीच्या रम नं ४०१ मध्ये अज्ञात चोरट्रायांनी प्लेटचे लॉक तोडून घरफोडी केली. चोरटयांनी घरात प्रवेश करून कपाटातील ११ लाख १३ हजाराचा ऐवज चोरून नेला होता. सदर प्रकरणी आफरीन शेख आणि आरोपी सलमा शेख यांनी ५ डिसेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार नोंदविली. मुंब्रा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहारी चौरे यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. या फुटेजमध्ये तक्रारदाराची भावजयी सलमा शेख ( वय. ३९ रा. चीस्तीया नगर मुंब्रा) हिच्या मदतीने तिच्या सहकाऱ्यांनी सदर घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.
- चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत -
या चोरट्यांनी लॅपटॉप, मनगटी घड्याळ, मोबाईल आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ११ लाख १३ हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. आरोपी सलमा शेख हिचा पती जसिम हा बनावट नोटा प्रकरणी कारागृहात बंद आहे. तीन वर्षापूर्वी त्याला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. अखेर मुंब्रा पोलिसांनी शिताफीने तपास करीत ११ लाखाच्या घरफोडीच्या आरोपींना अवघ्या १२ तासात गजाआड करण्यात यश मिळवले.