ठाणे - लोकल, मेल, एक्सप्रेस ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या ( Fatka Gang In Mumbai Local ) प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल, पर्स , बॅग पळविणाऱ्या फटका गँगच्या सराईत गुन्हेगाराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ( Fatka Gang Arrest By Thane Police ) फिल्मी स्टाईलने पाठलाग करत जेरबंद केले आहे. अजय अर्जुन कांबळे, (२४) रा. होमबाबा टेकडी, पत्रीपुल, कल्याण, असे जेरबंद केलेल्या फटका गँगच्या गुन्हेगारच नाव आहे.
प्रवाशांच्या हातावर मारायचा फटका :मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या लोकल, मेल ट्रेनमधून दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हातावर फटका मारुन मोबाईल व इतर वस्तू पळविणाऱ्या विरोधात कारवाईची मोहीम १६ मार्च पासून राबविण्यात येत आहे. यासाठी विविध फटका गँगच्या पाईंटवर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाल्मीक शार्दुल यांनी गुन्हे तपास पथकाची नेमणूक केली. या पथकात पोलीस उपनिरक्षक पवार, पोहवा, कुटे, पोना जगताप, विशे, चव्हाण, शेळके, केदार व व्हरकट यांना सुचना व मार्गदर्शन करुन पथक तयार करुन या पोलीस पथकांना फटका गँग पॉईटंच्या ठिकाणी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्याअनुषगाने २१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास डाऊन बदलापूर लोकलच्या मोटरमन बाजूकडील प्रथम वर्गाच्या महिलांच्या डब्यात डाव्या बाजुच्या दरवाज्यात उभे राहून एक महिला प्रवास करीत होती. त्यावेळी लोकल कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान स्लो धावत असताना पोल नं.५३/२०२० वर फटका गँगचा आरोपी अजय चढून पूर्व तयारी करुन बसला होता.