ठाणे :भारताचे पंतप्रधान यांचा महत्वाकांक्षी असा समजला जाणारा प्रकल्प आता रखडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत (Metro 4 Project Delay) आहे. ठाणे आणि मुंबई मेगासिटीला जोडणारे मेट्रोचे जाळे विस्तारित करण्याचा आणि तासंतास प्रवासाऐवजी अल्पावधीतच मुंबई आणि ठाण्यात कुठेही पोचविणारे मेट्रोचे जम्बो जाळे याला कंत्राटदाराचे ग्रहण लागल्याचे चित्र (Metro Project Costs increased due to contractors) आहे. या ग्रहणामुळे ठेकेदारांचे चांगभले तर जनतेच्या पैशाचा चुराडा झाला. शिवाय मुदतवाढ मिळाल्याचे चित्र आहे. २०२२ मध्ये मेट्रो सुरु होण्याची शक्यता सध्या तूर्तास लांबली असून आता २०२६ पर्यंत ठाण्यात मेट्रो धावण्याची शक्यता (Metro 4 Project Delay due to contractors) आहे.
मेट्रो ४ प्रकल्प - हा महत्वाकांक्षी आणि ठाण्यात मेट्रोचे जाळे पसरणार ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि जलद होणार असल्याने मेट्रो ४ च्या प्रकल्पाला मान्यता मिळाली. राज्य सरकारने २७ सप्टेंबर २०१६ मध्ये मेट्रो-४ च्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्याच्यासाठी १४ हजार ५४९ कोटींचा निधी निर्धारित करण्यात आला. २५ ऑक्टोबर २०१६ ला शासनाचा निर्णय निघाला. मेट्रो-४ च्या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला २८३ कोटी २१ लाखाचा निधी देण्यात आला. अन मेट्रोच्या कामासाठी ५४ महिन्याचा निर्धारित कालावधीही देण्यात आला. त्यानंतर मेट्रोच्या जाळ्याचा फेरविचार झाला आणि मेट्रोचे जाळे गायमुख पर्यंत विस्तारित करण्यात (Metro 4 Project Costs increased) आला.
प्रकल्प रखडल्याने आर्थिक नुकसान -मेट्रो-४ च्या कामासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला २८३ कोटी २१ लाख रुपये दिल्या नंतर २०२२ मध्ये काम पूर्ण करण्याची डेड लाईन होती. मात्र कोविडच्या महामारीमुळे कामाला ब्रेक लागला. त्यात एका ठेकेदाराने काम खुप संथ गतीने केले. यामुळे मेट्रोच्या कामाचे नियोजन बिघडले. कामे रखडल्याने मेट्रोच्या किमतीत वाढ झालीच, त्याशिवाय मेट्रोच्या सल्लागार कंपनीच्या खर्चातही वाढ झाली. ती ३३.९४ टक्के म्हणजेच २८३ कोटी २१ लाखावरून ३७९ कोटी ३२ लाखावर पोहचली. मुदतीच्या बाबतीत २०१६ मध्येच ५४ महिन्याची मुदत हि संपुष्टात आल्यानंतर अतिरिक्त मुदत वाढीत पुन्हा ३३ महिन्याने वाढल्याने मेट्रो-४ ला प्रलंबितचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता २०२२ ची मेट्रो-४ ही २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान मेट्रो-४ चे काम हे विहित कालावधीत पूर्ण होईल कि नाही, असे प्रश्नचिन्हच निर्माण होत आहे. एकीकडे वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली-गायमुख मेट्रो चार आणि मेट्रो चार-अ या प्रकल्पांसाठी राज्य शासन दुय्यम कर्जाच्या रूपाने आर्थिक उभारणी करत आहे. तर दुसरीकडे मात्र रखडपट्टीमुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होत असल्याचे चित्र (Metro 4 Project)आहे.