महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जलवाहतुकीच्या कामाला गती देण्यासाठी खासदार राजन विचारेंनी घेतली केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडवियांची भेट - Union Minister of State for Water Transport Mansukh Mandavia

ठाणे शहराला लाभलेला खाडी किनारा तसेच शहरात होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषण टाळण्यासाठी पाच महापालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा पर्याय आवश्यक आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेत, तत्कालीन जलवाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ३१ जुलै २०१७ रोजी संबंधीत प्रस्तावाचे सादरीकरण केले. या प्रस्तावाला दि. २४ ऑक्टोबर २०१८ रोजी ६४५ कोटीची मंजुरी मिळाली होती.

mp rajan vichare minister mansukh manviya
राजन विचारे-मनसुख मांडविया

By

Published : Feb 11, 2020, 4:36 AM IST

ठाणे -खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली आहे. ठाणे महानगरपालिकेने बनविलेल्या जलवाहतूक प्रकल्पाचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमार्फत सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी विचारे यांनी राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. यावेळी विचारे यांनी मांडविया यांना पत्राद्वारे निधी लवकरात लवकर वर्ग करण्याची मागणी केली.

हेही वाचा... देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

ठाणे शहराला लाभलेला खाडी किनारा तसेच शहरात होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषण टाळण्यासाठी पाच महापालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा पर्याय आवश्यक आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेत, तत्कालीन जलवाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ३१ जुलै २०१७ रोजी संबंधीत प्रस्तावाचे सादरीकरण केले. या प्रस्तावाला दि. २४ ऑक्टोबर २०१८ रोजी ६४५ कोटीची मंजुरी मिळाली होती. काम सुरू करण्यासाठी सल्लगारांच्या नियुक्तीसाठी ठाणे महानगरपलिकेने २१ कोटी रुपये खर्चापैकी पहिल्या टप्प्यात बनवलेल्या डी.पी.आरसाठी 6 कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी दुसऱ्या टप्यातील डी.पी.आरसाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे.

त्याचेही काम सध्या सुरु आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जलवाहतूक केंद्रीय मंत्री मंनसुख मंडाविया यांची दिनांक १७ जुलै २०१९ प्रत्यक्ष भेट घेत, या विकास प्रकल्पाबाबत सादरीकरण केली.तसेच चर्चा केली होती. यामध्ये १००% अनुदान देण्याचे मंजूर करण्यात आले. हे काम तांत्रिकदृष्ट्या मेरीटाईमबोर्डमार्फत सुरु करण्याचे आदेश निर्गमित केल्यानंतर दिनांक २ जानेवारी २०२० रोजी आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील १० 'जेटी'पैकी मीरा भाईंदर, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली या ४ जेटींची कामे सुरु करण्यासाठी ८६ कोटींचा सविस्तर प्रस्ताव केंद्रीय अनुदान प्राप्त होण्यासाठी मेरी टाईम बोर्डास ठाणे महानगरपालिकेमार्फत देण्यात आला आहे.

हेही वाचा.... कोरोनाचा भारतीय औषधी उद्योगावर परिणाम होण्याची भीती

ठाणे महानगरपालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांना अग्रेषित केला. पहिल्या टप्प्यातील ४ जेट्टींच्या सुरु झालेल्या कामासाठी ८६ कोटींचा निधी निर्गमित करण्यासाठी संबधिताना आदेश पारित करावे. तसेच उर्वरित ६ जेट्टींची कामे सुरु होण्यासाठी उर्वरित ५५९ कोटींचा मंजूर निधी ही लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली.

त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील ठाणे-मुंबई-नवी मुंबई या 9३ किलोमीटरच्या मार्गावरही 18 जेटीची व अनुषंगिक कामे सुरू होण्यासाठी आवश्यक लागणारा 717 कोटींचा निधी देखील लवकर मंजूर करावा. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन जलवाहतूक प्रकल्प यशस्वी पूर्ण करण्यासाठी सल्लागारांसाठी २१ कोटी आपल्या तिजोरीतून खर्च केले. तरी हा खर्च महापलिकेस उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली.

हेही वाचा... गतवर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत जानेवारीत ८ टक्के घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details