महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MP Rahul Shewale demand : सर्वच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या, खासदार राहुल शेवाळे यांची मागणी - MP Rahul Shewale demand

कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (Govt employee welfare grant amount) द्यावे, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale demand) यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन (MP Rahul Shewale CM demand) दिले.

MP Rahul Shewale demand
MP Rahul Shewale demand

By

Published : Oct 1, 2022, 8:54 PM IST

मुंबई : कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (Govt employee welfare grant amount) द्यावे, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale demand) यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन (MP Rahul Shewale CM demand) दिले.




शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करा-गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरातील जनतेला सण आणि उत्सव अतिशय मर्यादित स्वरूपात साजरे करावे लागेल होते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट दूर झाल्याने राज्यभरात सर्व सण आणि उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शिंदे सरकारने यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गेल्या दोन वर्षांत अहोरात्र मेहनत करणारे सर्वच शासकीय कर्मचारी, अधिकारी, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी या सर्वांनाच यथोचित सानुग्रह अनुदान देऊन त्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी आणि आरोग्य सेविकांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेवाळे यांचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details