महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खासदार निधीतून कुमार केतकरांची 10 रुग्णालयांना अडीच कोटींची मदत - ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव

ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांसाठी असलेल्या सुविधा आणि उणीवा याबाबत पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गंभीर परिस्थिती झाली आहे. तर तिसऱ्या लाटेत रुग्णांना सुविधा मिळाव्या यासाठी पत्रकार आणि काँग्रेस राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी त्यांच्या खासदार निधीतील अडीच कोटी रुपये जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी दिले आहे.

पत्रकार आणि खासदार कुमार केतकर
पत्रकार आणि खासदार कुमार केतकर

By

Published : May 7, 2021, 10:58 PM IST

ठाणे -ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांसाठी असलेल्या सुविधा आणि उणीवा याबाबत पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गंभीर परिस्थिती झाली आहे. तर तिसऱ्या लाटेत रुग्णांना सुविधा मिळाव्या यासाठी पत्रकार आणि काँग्रेस राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी त्यांच्या खासदार निधीतील अडीच कोटी रुपये जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी दिले आहे. दहा रुग्णालयांना प्रत्येकी २५ लाख दिल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. तसेच ही मदत या काळात खूप मोठी ठरणार असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.

'ही मदत ठरणार मोलाची'

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या काळात रुग्णसेवा आणि रुग्णालये यांच्यातील उणिवांमुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान आता आपण तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तयारी करीत असताना खासदार कुमार केतकर यांची अडीच कोटींची मदत ही मोलाची ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील दहा रुग्णालयांना प्रत्येकी २५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयाच्या सुविधा वाढविण्यासाठी हा निधी खर्च व्हावा आणि जिल्ह्यातील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी म्हणून केतकर यांनी खासदार निधीचा विनियोग जिल्ह्यासाठी व्हावा म्हणून अडीच कोटींची मदत केलेली आहे. त्यांची ही मदत तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -'हॉटेल-बार व्यवसायिकांना करात सवलत द्या', पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details