महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मीरा भाईंदरमध्ये आईची सहा वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या - आईची सहा वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या

काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीतील गौरव गॅलक्सि फेस-1, नित्यानंद नगर शांती गार्डन परिसरात राहणाऱ्या आईने आपल्या पोटाच्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन टेरेसवरून उडी मारली (Mother committed suicide). जवळच्या भक्ती वेदांत रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र दोघांचा मृत्यू झाला होता.

मीरा भाईंदरमध्ये आईची सहा वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या
मीरा भाईंदरमध्ये आईची सहा वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या

By

Published : Sep 17, 2022, 10:32 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीतील गौरव गॅलक्सि फेस-1, नित्यानंद नगर शांती गार्डन परिसरात राहणाऱ्या आईने आपल्या पोटाच्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन टेरेसवरून उडी मारली. (Mother committed suicide) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दोन्ही शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवले आहे. यासंदर्भात काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याशी संपर्क साधला असता पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

रक्ताच्या थारोळ्यात पत्नी -सुरेश देवासी आपल्या पत्नी व दोन मुलांसह गौरव गॅलक्सी दुकान नंबर १ नित्यानंद नगर समोर राहत आहेत. दुकानातच त्यांचा स्वतःचा स्टेशनरीचा व्यवसाय आहे. मागील दोन ते तीन चार दिवसांपासून पत्नी रेखा देवासी असे सांगत होती की, माझे डोके काम करत नाही. जीव द्यावा वाटत आहे. नेहमीप्रमाणे सुरेश शनिवारी सकाळी ८ वाजता दुकानात गेला. त्यातच दुपारच्या तीनच्या सुमारास इमारतीचा वॉचमेन येऊन माहिती दिली की आपली पत्नी आणि मुलगी टेरेसवरून पडली आहे. तात्काळ सुरेश यांनी दुकान बंद करून गेला असता रक्ताच्या थारोळ्यात पत्नी रेखा,आणि मुलगी अंकिता (वय ६) पडले होते. जवळच्या भक्ती वेदांत रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र दोघांचा मृत्यू झाला होता.

काशीमीरा पोलिस घटनास्थळी -या घटनेची माहिती मिळताच काशीमीरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचा मृत्यू झाल्याने नेमकं काय कारण आहे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरी सुरेश यांनी कोणावर संशय नसल्याची माहिती पोलिसांना दिली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलिस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details