महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Azan In Mumbra : मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंब्य्रात पोलीस बंदोबस्तात अनेक मशिदीमध्ये सकाळची अजान - अजान मुंब्रा ठाणे

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या ( Loudspeakers On Mosque ) विरोधात आंदोलन म्हणून मशिदींसमोर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Agitation ) लावण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मुंब्रा परिसरात ( Azan In Mumbra ) पोलीस बंदोबस्तात न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सकाळची अजान पार ( Azan In Police Protection ) पडली.

Azan In Mumbra Of Thane
मुंब्य्रात पोलीस बंदोबस्तात अनेक मशिदीमध्ये सकाळची अजान

By

Published : May 4, 2022, 7:51 AM IST

ठाणे :आज ठाण्यातील मुंब्य्रात पहाटेची अजान ( Azan In Mumbra ) पठण न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून झाली. यावेळी मुंब्य्रात अनेक मशिदींसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभरात पाच वेळा होणाऱ्या नमाजसाठी परवापासूनच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला ( Azan In Police Protection ) आहे.

जमावबंदी लागू :महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने मुंब्रा पोलिसांकडे लेखी पत्र देऊन नमाजदरम्यान हनुमान चालीसा पठणसाठी अर्ज ( Hanuman Chalisa Agitation ) होता. मात्र हा अर्ज नाकारत मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना कलम 149 नुसार कारवाईची नोटीस देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा प्रत्येक मशिदीबाहेर लावण्यात आलेला आहे. काल पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये ठाणे पोलिसांनी जमावबंदीचे कलम 144 लागू केले होते. या परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्यानुसार कोणतेही राजकीय आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली होती. आज सकाळी पहाटेचे नमाज पठण पोलिसांच्या बंदोबस्तात आले.


मनसचे नेते झाले भुमिगत :ठाणे पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मनसेचे नेते हे भूमिगत झाले असून, पोलिसांच्या कारवाईला टाळण्यासाठी अनेक नेते भूमिगत झाल्याचे पाहायला मिळाले. आज खरंतर मनसेने दिलेल्या डेडलाईनची पूर्तता झाल्यावर भोंग्याचा वापर करून देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली होती. निर्धारित आवाजात भोंगे वापरावेत असे आदेश देखील दिले होते.


पाचही नमाज वेळी असणार पोलिसांचा बंदोबस्त :दिवसातून पाच वेळा होणाऱ्या मुस्लिम समाजाच्या नमाज पठणाच्या वेळी ठाणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त दिला असून, या पाचही वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे. यासह पोलिसांसोबत रॅपिड ऍक्शन फोर्स देखील तैनात असणार आहे.

हेही वाचा : Loudspeaker Row LIVE Updates : चारकोपमध्ये इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा

ABOUT THE AUTHOR

...view details