ठाणे - आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 696 दिवसभरात वाहनचालकांवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. याचप्रमाणे शहर पोलिसांनीदेखील लॉकडाऊनमध्ये जवळपास 2 हजार 570 वाहने जप्त केली आहेत. लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे.
ठाण्यात तीन हजारांहून अधिक वाहने जप्त; विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना कायद्याचा बडगा
आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 696 दिवसभरात वाहनचालकांवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात संचारबंदी जाहीर झाली. पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करून सर्वत्र नाकाबंदी केली आहे. यानंतर पोलिसांनी परराज्यात पलायन करणाऱ्या 800हून अधिक जणांना पकडले आहे. तसेच संबंधितांची वाहनेदेखील जप्त करण्याती आली आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 600हून अधिक जणांविरोधात तब्बल 242 गुन्हे दाखल केल्याची माहिती माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी एकाच दिवसात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तब्बल 696 वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत 2 लाख 70 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर गेल्या दोन दिवसात संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकूण 18 आरोपींविरोधात 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत आठ वाहने जप्त करण्यात आली आहेत.