ठाणे- महापालिका उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिकेतील कर्मचारी वर्गामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या मुख्यालयात तसेच प्रभाग समितीमध्ये एकाच खुर्चीवर वर्षानुवर्षे थांड मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी परिपत्रक काढून एकप्रकारे होलसेल बदल्या केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी ठामपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकाची बोटे फेरीवाल्यानी छाटल्यानंतर ठाण्यातील फेरीवाल्यांकडील वसुली आणि अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला होता. महासभेतही कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करून लोकप्रतिनिधिनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यामुळे प्रशासनाने अखेर कठोर निर्णय घेऊन नऊही प्रभाग समितीतील लिपिक, बिगारी व शिपाई प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बदल्या केल्या.
उशिराने आली जाग-
ठाणे महापलिकेच्या मुख्यलायत आणि प्रभाग समितीमध्ये विविध पदावर कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये असलेल्या ठाणे मनपातील १७० कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून, १६ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये ९ प्रभाग समिती मधील असलेल्या बिट निरीक्षक, शिपाई ,मुकादम यांच्यासह बिगारी याची तडकाफडकी केली असून यामध्ये अतिक्रमण विभाग आणि कर वसुली विभागमधील कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. या बदल्या जर वेळच्या वेळी केल्या तर नियमांचे पालन देखील होते. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने या बदल्या सोइने होत असल्याचा आरोप नेहमी पालिकेवर होत असल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने उमटू लागल्या आहेत.
कल्पिता पिंपळे प्रकरणानंतर प्रशासानाला उशिराने जाग; अतिक्रमण विभागातील त्या 170 कर्मचाऱ्यांच्या केल्या बदल्या - बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल््या
काही महिन्यांपूर्वी ठामपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकाची बोटे फेरीवाल्यानी छाटल्यानंतर ठाण्यातील फेरीवाल्यांकडील वसुली आणि अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला होता. महासभेतही कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करून लोकप्रतिनिधिनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यामुळे प्रशासनाने अखेर कठोर निर्णय घेऊन नऊही प्रभाग समितीतील लिपिक, बिगारी व शिपाई प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बदल्या केल्या.
170 कर्मचाऱ्यांच्या केल्या बदल्या