ठाणे- राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत ( Corona cases increasing in Maharashtra ) आहे. उल्हासनगरमधील शासकीय बालसुधारगृहातील मुलांना कोरोनाची लागण ( corona cases in juvenile home in Ulhasnagar ) झाली आहे.
जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील खडवलीतील वृद्ध आश्रमाधील ७० हून अधिक वृद्धांना कोरोनाची ( corona cases in Bhivandi ) लागण झाली आहे. त्यापाठोपाठ चिंधीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील ३० विद्यार्थाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर ( corona cases in gov school ) आले होते. तेव्हापासून शासकीय वस्तिगृह, आश्रम व निवासी शाळामध्ये सरकारने कोरोना लसीकरण सुरू ( Vaccination in gov residential school ) केले. मात्र, उल्हासनगरमधील बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यामुळे कोरोनाची लागण मुलामध्ये पसरल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा-Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 48 हजार नवे रुग्ण; 52 बाधितांचा मृत्यू
कोरोना बाधित मुलांची प्रकृती स्थिर
उल्हासनगर शहरातील हे सुधारगृह आहेत. त्यामधील १५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला येथील ४ मुलांची अँटीजन केल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे उर्वरित २९ मुलांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यातील ११ मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. या सगळ्या मुलांना उल्हासनगर महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी ( Medical offcer Dilip Pagare ) दिली आहे. सर्व कोरोनाबाधित मुलांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगितले.