ठाणे -कोरोनामुळे गणपतीच्या सणांवरदेखील परिणाम दिसून येत आहे. गेले दोन वर्षे गणेशभक्त मोठ्या प्रमाणात शाडूच्या मातीच्या मूर्तींना पसंत करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पन्नास ते सत्तर टक्के नागरिक हे शाडू मातीच्या मूर्तींकडे वळलेले दिसून येत आहेत.
पूर्वीच्या काळात मातीच्या मूर्ती बनविल्या जात होत्या. त्यानंतर कालांतराने मूर्तींचा प्रकार बदलत हलक्या व स्वस्त दरात असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. परंतु या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित होत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची प्लास्टर ऑफ पॅरिसला कमी पसंती झाली आहे. गेली काही वर्षे शाडू मातीच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शाडू मातीच्या मुर्तींना पसंती देत असल्याचे मूर्तीकार किशोर गुरव सांगतात.
हेही वाचा-अनिल देशमुख यांच्या वकीलासह सीबीआयच्या उपनिरीक्षकाला आज न्यायालयात केले जाणार हजर
घरच्या घरी होते मूर्तींचे विसर्जन
गेल्या वर्षी घराबाहेर पडणेदेखील मुश्कील होते. त्यामध्ये शाडू मातीच्या मूर्तींना पसंती देऊन घरातच गणपती बाप्पाचे आगमन करून घरातच विसर्जनदेखील करता आले. यामुळे कोरोना संसर्गापासून दूर राहता आले. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जनदेखील पूर्णपणे होत नाही. त्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्ती आम्ही पसंत केल्याचे ग्राहकांचे मत आहे. येणाऱ्या काही वर्षात फक्त शाडू मातीच्या मूर्ती पाहायला मिळतील असा विश्वास मूर्तीकारांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या पिढीमधील तरुण हे शाडूच्या मूर्तींचा व्यवसायात प्रगती करताना दिसून येईल.