ठाणे - मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला हिसका देत धूम ठोकल्याची घटना ठाणे न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
ठाणे न्यायालय परिसरातून मोक्काचा आरोपी पळाला - मोक्का
ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या नरेश याला पोलीस कर्मचारी पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात होते. त्यावेळी नरेश याने बेड्यांमधून हात काढून धूम ठोकली
भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी मोक्का गुन्ह्यांतर्गत आरोपी नरेश छाब्रिया (४०) याला अटक केली होती. आज ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या नरेश याला पोलीस कर्मचारी पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात होते. त्यावेळी नरेश याने बेड्यांमधून हात काढून धूम ठोकली. पोलीस कर्मचाऱ्यांकडे इतर २ आरोपी असल्याने त्यांना ऐनवेळी नरेशच्या मागे धावणे अशक्य झाले. त्याचवेळी न्यायालयाबाहेरील रहदारीचा फायदा घेत नरेश फरार झाला असून या घटनेनंतर अशा बेजबाबदार पोलिसांवर कोणती कारवाई होणार, या चर्चांना उधाण आले आहे.