ठाणे -राज्यातील राजकीय परिस्तिथी बिघडली असून प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेते आपलं संघटन टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. मुख्य म्हणजे शिवसेना टिकवून ठेवण्यासाठी आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) निष्ठा यात्रा करत ( Shiv Samvad Yatra ) आहेत तर, त्यांचेच चुलत बंधू म्हणजेच अमित ठाकरे ( Amit Thackeray ) हे महासंपर्क यात्रा ( Mahasamparka Yatra ) करत आहेत. दोन्ही ठाकरे युवानेतृत्व आपल्या पक्ष बांधणी साठी सज्ज झाले आहेत. मात्र, ठाण्यातील महासंपर्क यात्रेत अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सूचक वक्तव्य केले आहे. जर, शिंदे गट फुटला नसता तर, हा दौरा आदित्य ठाकरे यांनी केला असता का ? मी तर आदित्य ठाकरे यांच्या आधी पासून महासंपर्क यात्रा सुरु केल आहे. असे देखील अमित ठाकरे यांनी सांगितले. तर, रस्त्यावर कार चालवावीशी वाटत नाही, म्हणून मी जिथे शक्य आहे. तिथे लोकल ने प्रवास करतो. राजसाहेबाना सत्ता द्या नाशिक मध्ये सत्ता आल्यानंतर बांधलेले रस्ते अजून खराब झाले नसून असेच रस्ते महाराषट्रात पाहायला मिळतील असे देखील अमित ठाकरे म्हणाले .
विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्ते पदधिकऱ्यांसोबत संवाद - महाराष्ट्रातील तरुणांना मनविसेमध्ये सामील करण्यासाठी आणि तरुणानां मनसे कडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे रविवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांचे मोठ्या उत्साहात तरुणांनी स्वागत केले . अमित ठाकरे यांनी सदेव विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्ते पदधिकरी यांच्या सोबत संवाद साधला . यावेळी अनेकांनी अंतर्गत वादाची तक्रार ठाकरे याना केली मात्र अंतर्गत वाद नसतील तर पक्ष मोठा होत नाही असे देखील सूचक वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले. तर, मनविसेचे पदाधिकारी महापालिका निवडणुकीत उतरणार कि नाही हा निर्णय राजसाहेब घेतील असे देखील अमित ठाकरे यांनी सांगितले . आता महासंपर्क यात्रे दरम्यान, तरुणानां संभोधित करून महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचज्या प्रश्नांसाठी मनविसे ताकदीने उभी राहणार असल्याचं अमित ठाकरे यांनी सांगितले .