महाराष्ट्र

maharashtra

MNS Hanuman Chalisa : मुंब्रामध्ये पहाटे हनुमान चालीसाचे सूर घुमणारच; अविनाश जाधवांचा इशारा

By

Published : May 3, 2022, 8:25 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या ( High Court ) आदेशाने पालन न करता मुंब्र्यातील मशिदवरील भोंगे ( Mosque Loudspeaker in Mumbra ) वाजवलात तर सकाळी ५ वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) वाजवण्यात येईल, असा इशारा ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ( MNS Palghar District President Avinash Jadhav ) यांनी दिला आहे.

अविनाश जाधव
अविनाश जाधव

ठाणे -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेंटमनंतर मुंब्र्यातील मशिदिवरील भोंगे पोलिसांनी उतरवले नाहीत आणि अनधिकृतपणे सकाळची बांग सुरू झाली, तर मनसेचे कार्यकर्ते मुंब्र्यात धडकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ( High Court ) आदेशाने पालन न करता मुंब्र्यातील मशिदवरील भोंगे ( Mosque Loudspeaker in Mumbra ) वाजवलात तर सकाळी ५ वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) वाजवण्यात येईल, असा इशारा ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ( MNS Palghar District President Avinash Jadhav ) यांनी दिला आहे.

लाऊडस्पीकर हा विषय धार्मिक नसुन सामाजिक आहे. सामाजिक समस्या म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे. बऱ्याच वर्षांपासून हा विषय सुटता सूटत नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे पालन आम्ही नक्की करणार, असल्याचे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. मशिदीवरील भोंगे पोलिसांनी काढले नाहीत. तर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला असल्याने ठाणे जिल्ह्यात हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केला आहे. तसेच, भोंगा उतरवला नाही तर मुंब्रा येथील मशिदी बाहेर संघर्ष करणार, असे आव्हान अविनाश जाधव यांनी दिल्याने ठाण्यात भोंग्यांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मुंब्रा पोलिसांनी परवानगी नाकारत दिली नोटीस :आज मुंबई पोलिसांनी अविनाश जाधव यांच्या हनुमान चालीसा पठणाच्या परवानगी अर्जाला नामंजूर करत अविनाश जाधव यांना कलम 149 नुसार नोटीस बजावली आहे. ज्यानुसार शांततेचा भंग झाला तर कायदेशीर कारवाई करण्याचीही नोटीस आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, यासाठी 9 तुकड्या एससारपीएफ आणि आरपीएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वातावरण बिघडू नये, म्हणून आम्ही नोटिसा बजावल्या आहेत. त्यासोबत काही लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केले असल्याचे सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी सांगितले आहे.

दहीहंडीचे मनाई असताना केले होते आयोजन :ज्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तो गुन्हा 25/08/2016 रोजी भादंवि 308,336,188,34 अ आणि म.पो.का. कलम 140 अन्वये दाखल झाला होता. त्याबद्दल आता चौकशीस बोलावण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. उद्या म्हणजेच 4 मे रोजी त्यांना नौपाडा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून, गैरहजर राहिल्यास योग्यतो कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. 2016 साली दाखल असलेल्या या गुन्ह्यातील कलमानुसार अविनाश जाधव यांनी दहीहंडीचे आयोजन करून या आयोजनाच्या दरम्यान इतरांच्या जीविताला धोका पोहोचेल, असे कृत्य केल्याने मनाई आदेश मोडून हा उत्सव साजरा केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे.


'राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन होणार' :ईद सणामध्ये व्यत्यय नको म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे रोजी ऐवजी ४ मे पासून भोंगे उतरलेच पाहिजेत, असा आग्रह धरला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधिन राहुन शासनानेच ही कार्यवाही करणे गरजेचे आहे. तरीही नाहक या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, हे दुर्दैवी असल्याचे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे. तेव्हा, भोंगे उतरले नाही तर, राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सज्ज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

उल्हासनगरमध्येही कारवाई :उल्हासनगर शहर अध्यक्ष बंडू देशमुखसह दोन प्रमुख पदाधिकाऱ्याना नोटीसा बजावून विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. तर डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांना भादंवि कलम १११ प्रमाणे नोटीस बजावून डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या चॉपर कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. दरम्यान औरंगाबाद येथिल सभेपूर्वीही कल्याण मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह ५ प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तसेच अंबरनाथ मनसे शहर प्रमुख कुणाल भोईर यांच्यासह ४ ते ५ प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. एकंदरीत मनसेची पुढील भूमिका आणि राज ठाकरे यांच्या अटकेपूर्वी जिल्हात कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा -Raj Thackeray : चिथावणीखोर भाषण भोवले.. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, 'असे' आहे संपूर्ण प्रकरण

ABOUT THE AUTHOR

...view details