ठाणे - राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या मांडीवर मोठे झालेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे काही गुण त्यांच्याकडे उपजतच आले असल्याचे महाराष्ट्र बघत आहे. राज साहेबांच्या उत्तर सभेनंतर देखील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. मात्र आमचे बोलून झाले आहे. त्यामुळे आता मनसे उत्तर देणार नाही तर काम करेल असे मत मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी डोंबिवलीत व्यक्त केले. ते मनसे आमदार राजू पाटील यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी गुरुवारी रात्री डोंबिवलीत आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेची पुढील वाटचालीवर त्यांनी मत व्यक्त केले.
Bala Nandgaonkar : 'आता मनसे उत्तर देणार नाही, तर काम करेल'
राज ठाकरे यांनी घेतलेल्या दोन्ही सभेनंतर शरद पवारांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. याचा अर्थ शरद पवार स्वतः राज ठाकरे, मनसे आणि इंजिन यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. कारण इंजिन फास्ट धावत असल्याची त्यांना देखील जाणीव झाली आहे. असे मत देखील मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
शरद पवारांच्या प्रतिक्रियामुळे इंजिन फास्ट - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सहसा कोणत्याही गोष्टीवर लवकर प्रतिक्रिया देत नाहीत. मात्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या दोन्ही सभेनंतर त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. याचा अर्थ शरद पवार स्वतः राज ठाकरे, मनसे आणि इंजिन यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. कारण इंजिन फास्ट धावत असल्याची त्यांना देखील जाणीव झाली आहे. असे मत देखील मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
राजीनामा देणाऱ्या इरफान शेखची समजूत काढणार - राज ठाकरे यांच्यासोबत अत्यंत आनंदात असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगताना मनसे महाराष्ट्र राज्य सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या कल्याणातील इरफान शेख यांच्याशी संपर्क साधला असून तो होऊ शकला नाही. मात्र मी स्वतः इरफानला फोन करून समजूत काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.