महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Avinash Jadhav : 'मुख्यमंत्री काय ठाण्याला पंतप्रधानपद दिलं तरी...'; वाहतूक कोंडीवरुन मनसे संतप्त

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात वाहतूक कोंडी वाढली आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत ( Traffic Jam Road Pits In Thane ) आहे. ठाण्याला मुख्यमंत्री काय पंतप्रधान जरी दिलं, तरी येथील समस्या कायम राहील, असा संतप्त सवाल अविनाश जाधव ( MNS Leader Avinash Jadhav ) यांनी केला आहे.

Avinash Jadhav
Avinash Jadhav

By

Published : Jul 8, 2022, 7:36 PM IST

ठाणे -मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्व ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकावे लागत ( Traffic Jam Road Pits In Thane ) आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच काय ठाण्याला पंतप्रधानपद जरी दिले, तरी येथील समस्या कायम राहतील, असा उद्वीग्न संताप ठाणे व पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे असून, यावेळी तरी विचार करून निर्णय घ्या, असे आवाहनही जाधव यांनी केलं ( MNS Leader Avinash Jadhav ) आहे.

गेले तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्वद्रुतगती महामार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर तसेच, ठाणे-माजीवडा जंक्शन-घोडबंदर रोड-कल्याण नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका शुक्रवारी ( 8 जुलै ) दुपारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर निघालेल्या अविनाश जाधव यांना बसला. त्यामुळे संतप्त होत त्यांनी प्रशासनासह, सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया

'यापुढे मतदान करताना....' -दरवर्षी प्रमाणे यंदाही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाचे आगमन यंदा उशिरा झाल्याने या कालावधीत उत्तम नियोजन केले गेले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे. ठाण्यात कितीतरी आमदार आहेत, त्या आमदारांना मंत्रीपदे दिली, तरी सुद्धा समस्या अजून सुटली नाही. सर्वसामान्य नागरिक कर भरतो, त्याचाही विचार केला जात नाही. तेव्हा, मुख्यमंत्रीच काय तर ठाण्याला पंतप्रधान दिले तरी ही समस्या तशीच राहणार आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता यायला हवी. तरच सुधारणा होतील अन्यथा या समस्या कायम राहतील. तेव्हा, यापुढे मतदान करताना विचार करा, असे आवाहन जाधव यांनी नागरिकांना केलं आहे.

वाहतूक कोंडीचा मोठा फटका - वाहतूक कोंडी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहेत. पण, अनेक शाळांना देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांनी शाळा बंद ठेवणं पसंत केलं. तर, काही शाळांमधील विद्यार्थी वाहतूक कोंडीमुळे उशिराने शाळेत पोहोचले. तसेच, रुग्णवाहिकांना देखील याचा फटका बसला आहे.

हेही वाचा -Uday Samant : शिवसेना पक्षावर दावा ठोकणार का?, उदय सामंतांनी स्पष्टचं सांगितलं...

ABOUT THE AUTHOR

...view details