ठाणे - महापालिकेच्या बाळकूम येथील कोविड रुग्णालयाच्या मुद्द्यावरून ठाण्यातील वातारण चांगलेच तापले आहे. कोविड रुग्णालयाच्या टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केला आहे. ते रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
कमीत कमी तीन वर्षाचा वैद्यकीय अनुभव असणे आवश्यक असताना केवळ तीन महिन्यांपूर्वी नोंदणी झालेल्या एका कंपनीला या रुग्णालयाचा ठेका देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या सर्व भ्रष्टाचारा विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे चेंबूरची नोंदणी असलेल्या कंपनीचा पत्ता घाटकोपर-मानखुर्द रस्त्यावर एका सध्या इमारतीच्या एका गाळ्याचा असल्याची माहिती त्यांनी उघड केली असून या भ्रष्टाचारामागे पानसे यांनी थेट ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेलाच टार्गेट केले आहे.