ठाणे - शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीदरम्यान ठाणेकरांना दिलेल्या वचननाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेली नाही. त्यामुळे, ठाणेकरांची फसवणूक झाली आहे. आणि याचीच जाणीव ठाणेकरांना व्हावी यासाठी ठाण्यात मनसेच्या वतीने हजारोंच्या संख्येने भव्य जनजागरण मोर्चा काढण्यात आला.
माहिती देताना मनसे ठाणे - पालघर जिल्हााध्यक्ष अविनाश जाधव हेही वाचा -चुकीची औषधे दिल्यामुळे चिमुरडीचा मृत्यू; दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
ठाण्यातील मासुंदा तलाव ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मनसे नेते अभिजीत पानसे, मनसे ठाणे - पालघर जिल्हााध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने काढण्यात आला. गेली दहा वर्षे जी वचने सत्ताधाऱ्यांनी दिलीत त्यातील एकही वचन पूर्ण केले नाही, याच्या विरोधात हा मोर्चा आहे, असे मनसे पदाधिकारी यांनी सांगितले.
यापुढे प्रत्येक चौकात फलक घेऊन उभे राहून लोकांना पटवून देऊ की, तुमची कामे पूर्ण झाली नाही, तुम्हाला दिलेली वचने सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली नाहीत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.
शिवसेनेने निवडणुकीत ठाणेकरांना आरोग्य कवच योजना, स्वतंत्र धरण, ३० एकरचे सेंटर पार्क, क्लस्टर योजना, ५०० चौरस फूट घराचे कर माफ, जल वाहतूक सुविधा, अशी अनेक आश्वासने दिली होती. मात्र, १० वर्षांत एकही आश्वासन शिवसेनेने पूर्ण केले नसल्याने ठाणेकरांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेनेला त्यांनी ठाणेकरांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आज ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा ते महापालिका मुख्यालय असा जनजागरण मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा -भिवंडीत अग्नितांडव सुरूच; गोदामाच्या छतावरील भंगाराला भीषण आग